आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. अनुपम टाकळकरांवर बंदूक रोखून तरुणाने मागितली 25 लाखांची खंडणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुरुवार दुपारी चारची वेळ. आकाशवाणी चौकातील त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. अनुपम टाकळकर नियमितपणे रुग्णांची तपासणी करत होते. बावीस वर्षांचा तरुण रुग्ण होऊन आत आला आणि म्हणाला, बहुत नोटा छाप रहे हो, जिंदगी सही सलामत चाहते हो तो, पचीस लाख रुपयोंका हप्ता देना पडेगा’. डाॅक्टरांनी त्याला विरोध करताच तो थोडा थबकला आणि त्याने डाॅक्टरावर पिस्तूल रोखली आणि मै फिरसे फोन करूंगा, मुझे मुख्तार भाईने भेजा है, मेरा नाम अतुल आहे. मला मजाक आवडत नाही, विष्णू सानप म्हणतात मला, असे म्हणत तो निघून गेला.
 
अनुपम आणि त्यांची पत्नी आसावरी प्रचंड घाबरले आणि त्यांनी घडलेला प्रकार तत्काळ पोलिसांना कळवला. पोलिस आयुक्त अमितेशकुमार फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सर्व पोलिस यंत्रणेने जाबजबाब नोंदवत टाकळकरांच्या फिर्यादीवरून जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल केला. डॉक्टरांनी केलेल्या वर्णनानुसार धमकी देणारा तरुण २२ ते २५ वयोगटातील होता. तो काळा सावळा, सडपातळ बांध्याचा होता. 
कसून चौकशी सुरू : घटनेनंतरपोलिसांची गुन्हे शाखा, विशेष शाखा तसेच सायबर सेलच्या अधिकाऱ्यांसह पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे, जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर स्वत: या प्रकरणाचा तपास करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी डॉ. टाकळकर यांना धमकीचा मेसेज आला होता. 
हा मेसेज बिहार येथून आला होता. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. डाॅ. टाकळकर म्हणाले, माझे आतापर्यंत कोणाशीही भांडण नाही. वैरही नाही. त्यामुळे हा प्रकार नेमका कुणी केला हे मी सांगू शकत नाही. दरम्यान, पोलिसांनी शहरातील विष्णू सानप मुख्तार नावाच्या व्यक्तींची यादीच तयार केली असून सिडको कटकट गेट परिसरातून काही व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...