आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोडक यांचे व्याख्यान उधळणाऱ्यांवर कारवाई करा : आमदार सावे यांचा कुलगुरूंकडे आग्रह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन सादर केले. - Divya Marathi
भाजप शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन सादर केले.
 
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्याच्या वादाने आता राजकीय वळण घेतले आहे. कार्यक्रम उधळून लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमदार तथा अधिसभा सदस्य अतुल सावे यांनी बुधवारी सकाळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली, तर दुसरीकडे माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांनी सायं. साडेचारला कुलगुरूंची भेट घेऊन तोडफोड करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली. 

तोडफोडीमागे कुलगुरूंचे निकटवर्तीय डॉ. गजानन सानप असल्याचे कुलगुरूंना माहीत असूनही त्यांनी कणखर भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने कुलगुरूंशी ४५ मिनिटे चर्चा करत तोडफोड करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांऐवजी कार्यक्रम उधळणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यांनी निवेदनात म्हटले की, ‘विद्यापीठात आयोजित व्याख्यान उधळून लावणे म्हणजे लोकशाही मूल्यांची गळचेपी आहे. गुंड कार्यकर्ते दहशत निर्माण करून विद्यापीठाची निरपेक्ष प्रतिमा डागाळण्याचा हा कुटिल डाव आहे. पूर्वी विद्यापीठात हस्तक्षेप करणाऱ्या राजकीय पक्षांच्या इशाऱ्यावरून हा प्रकार घडला आहे. अशा पद्धतीने गुंडगिरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा. शिष्टमंडळात जालिंदर शेंडगे, डॉ. भीमराव भोसले, मनोज पत्की, जयश्री चामरगोरे, गीता कावळे, डॉ. राम बुधवंत आदींचा समावेश होता. माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांच्याही शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली. सीसीटीव्ही फुटेज पाहून दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना निर्देश देण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठातील वातावरण चांगले राहण्यासाठी कुलगुरूंनी तटस्थ भूमिका घेण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात आनंद लोखंडे, कमलेश चांदणे, सचिन शिंदे, अरुण शिरसाट आणि प्रकाश नवतुरे आदींचा समावेश होता. 
 
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्याच्या वादाने आता राजकीय वळण घेतले आहे. कार्यक्रम उधळून लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमदार तथा अधिसभा सदस्य अतुल सावे यांनी बुधवारी सकाळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली, तर दुसरीकडे माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांनी सायं. साडेचारला कुलगुरूंची भेट घेऊन तोडफोड करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली. 
 
तोडफोडीमागे कुलगुरूंचे निकटवर्तीय डॉ. गजानन सानप असल्याचे कुलगुरूंना माहीत असूनही त्यांनी कणखर भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने कुलगुरूंशी ४५ मिनिटे चर्चा करत तोडफोड करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांऐवजी कार्यक्रम उधळणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यांनी निवेदनात म्हटले की, ‘विद्यापीठात आयोजित व्याख्यान उधळून लावणे म्हणजे लोकशाही मूल्यांची गळचेपी आहे. गुंड कार्यकर्ते दहशत निर्माण करून विद्यापीठाची निरपेक्ष प्रतिमा डागाळण्याचा हा कुटिल डाव आहे. पूर्वी विद्यापीठात हस्तक्षेप करणाऱ्या राजकीय पक्षांच्या इशाऱ्यावरून हा प्रकार घडला आहे. अशा पद्धतीने गुंडगिरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा. शिष्टमंडळात जालिंदर शेंडगे, डॉ. भीमराव भोसले, मनोज पत्की, जयश्री चामरगोरे, गीता कावळे, डॉ. राम बुधवंत आदींचा समावेश होता. माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांच्याही शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली. सीसीटीव्ही फुटेज पाहून दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना निर्देश देण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठातील वातावरण चांगले राहण्यासाठी कुलगुरूंनी तटस्थ भूमिका घेण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात आनंद लोखंडे, कमलेश चांदणे, सचिन शिंदे, अरुण शिरसाट आणि प्रकाश नवतुरे आदींचा समावेश होता. 
 
‘दिव्य मराठी’च्या वृत्ताला कुलसचिवांचा दुजोरा 
‘२७ डिसेंबर २०१६ रोजी शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार पंडित दीनदयाल यांची जयंती साजरी करण्याचे निर्देश आहेत; पण पुण्यतिथीचे नाहीत’ दिव्य मराठीने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताशी डॉ. जब्दे सहमत असून तरीही विद्यापीठ आपल्या स्तरावर महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असते, त्याचाच ‘तो’ भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोषींवर कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, होत असलेल्या दिरंगाईबद्दल त्यांना समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. या वेळी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, रासेयो समन्वयक डॉ. भीमराव भोसले उपस्थित होते. 

- विद्यापीठाशी काहीचसंबंध नसलेल्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात धुडगूस घालणे योग्य नाही. डॉ. मोडक यांचे विचार आंबेडकरवादी आहेत, त्यामुळे त्यांचे व्याख्यान होणे गरजेचे होते; पण ज्यांनी कार्यक्रम उधळला त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही केली आहे. तोडफोड करणाऱ्यांविषयी आम्हाला माहिती नसल्यामुळे त्यांच्याविषयी आम्ही कुलगुरूंना काहीच सूचना केलेली नाही.
-अतुल सावे, आमदार तथा अधिसभा सदस्य 

- आम्ही कुलगुरूंशीचर्चा करण्यासाठी गेलो, त्या वेळी प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे तिथे होते. त्यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्यामुळे आम्ही त्यांना बोलूच दिले नाही. कुलगुरूंना सांगितले की, अशी माणसे आधी विद्यापीठातून काढा, त्याशिवाय विद्यापीठातील धिंगाणा थांबवणार नाही. शैक्षणिक वातावरण चांगले ठेवण्यासाठी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्यास कुलगुरूंना सांगितले. गंगाधरगाडे, माजी राज्यमंत्री 
 
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तोडफोडीच्या प्रकरणावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बुधवारी प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांच्यामार्फत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तोडफोड करणाऱ्यांना विद्यापीठ पाठीशी घालत नसून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जब्दे यांनी म्हटले आहे. कारवाईसाठी होत असलेल्या दिरंगाईबद्दल पत्रकार परिषदेत मात्र त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. 
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई आदींची जयंती, पुण्यतिथी विद्यापीठात नेहमी साजरी केली जाते. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने युक्तिवाद करून कार्यक्रम उधळून लावला आहे. सर्वच महापुरुषांचे कार्यक्रम विद्यापीठ साजरे करत असते, पण गोंधळ केल्यामुळे विद्यापीठात अनुचित प्रकार घडल्याचे डॉ. जब्दे पटवून सांगत होते. वास्तविक, भाजपचे कार्यकर्ते सभागृहाची तोडफोड करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. तरीही विद्यापीठ आरोपींना पाठीशी का घालत आहे, याचे उत्तर प्रशासन देऊ शकले नाही. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे आणि डॉ. जब्दे यांनी घडल्या प्रकारावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कुलगुरू मात्र या प्रकरणावर काहीच प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. भाजप कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्यासाठी कुलगुरूंवर दबाव टाकण्यात आल्याची कुजबुज विद्यापीठात सुरू आहे. 
 
बहुजन क्रांती मोर्चाचे विभागीय आयुक्तांना निवेदन
औरंगाबाद - बहुजनक्रांती मोर्चातर्फे विभागीय आयुक्तांना १४ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्र असताना २८ नोव्हेंबरला पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतला नाही. मात्र, डॉ. सुहास मोराळे आणि डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. गजानन सानप यांनी दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्याचा घाट रचला. कुलगुरूंशी या विषयावर चर्चा सुरू असताना आम्हाला मारहाण करण्यात आली. शिवाय विद्यापीठाची तोडफोड करण्यात आली. अशा कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी आनंद लोखंडे, कमलेश चांदणे, सचिन शिंदे, प्रकाश नवतुरे, बलवान शिंदे, संदीप पट्टेकर, शेखर निकम, सचित सोनवणे, संदेश सोनवणे, दिनेश चांदणे आदींनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...