आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: भीमोत्सव; 86 ठिकाणी जयंती मिरवणुका, डीजेला रोखण्यासाठी पाच ठिकाणी चेक पॉइंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ जयंतीची जिल्ह्यात तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी ८६ ठिकाणी सार्वजनिक मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय गावागावांमध्येही विविध कार्यक्रम होणार अाहेत. बीड शहरात सकाळी साडेअाठ वाजता अभिवादन फेरी निघणार अाहे. जयंती मिरवणुकीत डीजे रोखण्यासाठी पाच चेक पॉइंट तयार करण्यात आले असून जिल्ह्यातून पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. बीड शहरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. 
 
डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. शुक्रवारी जयंतीदिनी बीड शहरात सकाळी साडेआठ वाजता अभिवादन रॅली निघणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अभिवादन सभा घेण्यात येणार आहे. सायंकाळी मिरवणुका निघणार आहेत. विशेष शाखेच्या माहितीनुसार जिल्ह्यात ८६ ठिकाणी सार्वजनिक मिरवणुकांसाठी परवानगी काढण्यात आली आहे. 

अशी निघणार सायकल फेरी 
शुक्रवारी(दि. १४) सकाळी साडेअाठ वाजता शहरातील स्नेहनगर बुद्धविहार येथून सायकल फेरी कढली जाणार अाहे. ही फेरी सहयाेगनगर, सुभाष राेड, अण्णाभाऊ साठे चाैक, जालना राेड, बसस्थान राेड, छत्रपती शिवाजी महाराज चाैक, नगरपालिका राेड, बशीरगंज, राजुरी वेस, कारंजा राेड, बलभीम चाैक, धाेंडीपुरा, माळी वेस चाैक मार्गे डाॅ. बाबासाहेब अांबेडकर पुतळा चाैक येथे येणार अाहे. या ठिकाणी डाॅ. अांबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सांगता हाेणार अाहे. ही सायकल फेरी शहरातील प्रमुख मार्गावरून जाणार असल्याने युवकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सायकल फेरीत सहभागी व्हावे, असे अावाहन विशाल वाघमारे, अाेंकार सवाई, विकास साबळे, अजय शिंदे, विशाल शिंदे, तुषार दाेडके, अभय इंगाेले, गणेश चाैधरी, अभिजित मस्के यांनी केले. 

माजलगाव येथे शुक्रवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त याच बैलगाडीतुन प्रतिमेची मिरवणुक काढण्यात येणार आहे. 
 
बाबासाहेबांची एेतिहासिक बैलगाडी माजलगावात 
उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे- तडवळे येथे २३ सप्टेंबर १९४१ रोजी महार-मांग वतन परिषदेसाठी ज्या बैलगाडीतून बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यात आली होती, त्याच बैलगाडीतून शुक्रवारी माजलगाव येथे सम्राट अशोकनगर भागात बाबासाहेबांची प्रतिमा ठेवून मिरवणूक काढण्यात येईल. 
 
असा असेल वाहतुकीत बदल 
{सोलापूर-धुळे महार्गावर मांजरसुंबा ते गढीपर्यंतचा मार्ग बंद राहील 
{जय भवानी चौक ते शिवाजी पुतळा मार्ग बंद 
{मोंढा टी पाॅइंट ते शिवाजी चौक मार्ग बंद 
{आंबेडकर चौक ते साठे चौक मार्ग बंद 
{चांदणी चौक, बलभीम चाैक, शिवाजी चौक मार्ग बंद 
 
असा असेल बंदाेबस्त 
बीड जिल्ह्यात शुक्रवारी ८६ ठिकाणी होणाऱ्या डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून ०२ अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ०७ पोलिस उपअधीक्षक, ०६ पोलिस निरीक्षक, २२ सपोनि पोलिस उपनिरीक्षक, १८३ कर्मचारी, ३६ महिला कर्मचारी, ०४ आरसीपी प्लाटून, ०३ एसआरपी प्लाटून, ५०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड तैनात
करण्यात आले आहेत. 
 
या ठिकाणी असेल तपासणी नाके : जिल्ह्यात डीजे बंदी करण्यात आलेली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात इतर जिल्ह्यांमधून डीजे येत असल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील डीजे रोखण्यासाठी ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले. आष्टी, गेवराई, परळी, बर्दापूर, माजलगाव या ठिकाणी हे नाके तयार करण्यात अाले असून अहमदनगर, औरंगाबाद, गंगाखेड, परभणी, लातूर या भागातून येणारे डीजे रोखण्याचे प्रयत्न करण्यात येईल. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...