आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : नोंदणी संपली,ऑगस्टमध्ये अधिसभा निवडणूक, 30 जुलैपर्यंत होईल छाननी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाॅ. प्रदीप जब्दे - Divya Marathi
डाॅ. प्रदीप जब्दे
औरंगाबाद - डाॅ.बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीसाठी अखेर गुरूवारी (२० जुलै) मतदार नोंदणी पूर्ण झालेली अाहे. सर्वच सहा मतदारसंघामध्ये ५० हजार ६५९ अाॅनलाईन नोंदणी झालेली अाहे. त्यामध्ये पदवीधर मतदारसंघात ४३ हजार ५२० नोंदणी झालेली अाहे. पुढील अाठवड्यात छाननी केल्यानंतर मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर अाॅगस्टच्या पहिल्या अाठवड्यात निवडणूक घोषित केली जाईल. 
 
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-२०१६ नुसार अधिसभा विविध प्राधिकरणांच्या निवडणुका होणार आहे. अधिसभा, पदवीधर महाविद्यालयीन शिक्षक प्राचार्यांच्या मतदारसंघात प्रत्येकी दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या प्रत्येक प्रवर्गात पाच जागा खुल्या असून उर्वरित पाच जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग भटके विमुक्त जाती-जमाती महिला प्रवर्गाचा समावेश अाहे. पदव्यूत्तर शिक्षकांच्या तीन जागा संस्थाचालकांच्या प्रतिनिधींसाठी दहा जागा अाहेत. या सर्व जागांच्या निवडणूकांसाठी २० जूनपासून मतदार नोंदणी सुरू अाहे. २० जुलैला अाॅनलाईन नोंदणीची अखेरची तारीख होती. या एक महिन्यामध्ये पदवीधर मतदारसंघात ४३ हजार ५२० नोंदणी झालेली अाहे. २६३ विद्यापीठीय अध्यापकांनी तर संलग्नित ४२५ महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मतदारसंघात निम्या म्हणजेच २१० प्राचार्यांनीच नोंदणी केली अाहे. विभागप्रमुखांच्या मतदारसंघात हजार १४० जणांनी नोंदणी केली अाहे. परिसंस्थांचे म्हणजेच संस्थाचालकांच्या मतदारसंघात देखिल फक्त २५८ जणांनी नोंदणी केली अाहे. महाविद्यालयानी अध्यापक मतदारसंघात हजार २६८ अाॅनलाईन नोंदणी झालेली अाहे. अाॅनलाईन नोंदणी केलेल्यांनी २२ जुलैपर्यंत निवडणूक विभागात प्रत्यक्षात कागदपत्र सादर करून अाॅफलाईन नोंदणी करणे गरजेचे अाहे. 
 
अाज निवडणूक सल्लागार समितीची बैठक अाहे. यावेळी पुढील दिशा ठरवण्यात येईल. ३० जुलैपर्यंत मतदार यादीची छाननी केली जाईल. त्यानंतर यादी प्रसिद्ध केली की, अाॅगस्टच्या पहिल्या अाठवड्यात अधिसूचना जारी करण्यात येणार अाहे. कधी नव्हे ते पहिल्यांदा नोंदणीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला अाहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. प्रदीप जब्दे यांनी सांगितले 
 
अाॅफलाइनला प्रतिसाद कमी 
अाॅनलाईन नोंदणी केलेल्यांनी २२ जुलैपर्यंत अाॅफलाईन करणे गरजेचे अाहे. मात्र १९ जुलैपर्यंत सर्व मतदारसंघात १३ हजार ५० जणांनीच अाॅफलाईन नोंदणी केली अाहे. पदवीधरमध्ये १० हजार २५८, विद्यापीठ अध्यापक १४०, प्राचार्य १५ तर ७४३ जणांनी विभागप्रमुख मतदारसंघात नोंदणी केली अाहे. संस्थाचालकांचे प्रतिनिधी १०१ अाणि हजार ७९३ महाविद्यालयीन अध्यापकांनी अाॅफलाईन नोंदणी केली अाहे.