आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब विद्यापिठाचा गजब कारभार! पिजीसाठी ‘सीईटी’ घेतली पण प्रवेश ‘सीईटी’नुसार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘पीजी-सीईटीद्वारेपात्र ठरलेल्यांनाच पीजीसाठी (पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी) प्रवेश देण्यात येतील,’ ही भूमिका डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मागे घेतली. १४ अाॅगस्ट रोजीच्या परिपत्रकात पीजी प्रवेशाचे नवे धोरण जाहीर केले अाहे. 

या निर्णयामुळे पीजी-सीईटी दिलेल्यांकडून घेतलेले शुल्क निरर्थक ठरलेले असताना पीजी-सीईटी देणाऱ्यांकडूनही शुल्क अाकारण्यात येणार अाहे. प्रशासनाने अाधीचेच शुल्क परत करणे गरजेचे असताना पीजी-सीईटी देणाऱ्यांकडूनही अाॅनलाइन शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला अाहे. संलग्नित महाविद्यालये अाणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागांसाठी पहिल्यांदाच १० जुलै रोजी संयुक्त ‘पीजी-सीईटी’ घेतली. पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या २१ हजार ९८१ जागा आहेत. पैकी विद्यापीठ कॅम्पसमधील ४२ विभाग, उस्मानाबाद कॅम्पसमधील विभागांत हजार ५३६ जागा आहेत, तर विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, बीड, जालना उस्मानाबाद जिल्ह्यांतील १२७ पीजी महाविद्यालयांत १९ हजार ४४५ जागा आहेत. त्यासाठी १० जुलैला संयुक्त प्रवेश पात्रता चाचणी घेतली होती. 

सीईटीची अट शिथिल 
दरम्यान,१७ जुलै रोजी कुलगुरू डाॅ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात तत्कालीन प्रभारी अधिकारी डाॅ. सतीश पाटील अाणि स्वतः कुलगुरूंनी पीजी-सीईटी न दिलेल्यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर १४ अाॅगस्ट रोजी नवनियुक्त प्रभारी अधिकारी डाॅ. वाल्मीक सरवदे यांच्या सहीने परिपत्रक जारी करण्यात आले अाहे. त्यात पीजी प्रवेशासाठी पीजी-सीईटीची अट पूर्णपणे शिथिल केल्याचे जाहीर केले अाहे. 

शुल्क परतकरणे गरजेचे 
पीजी-सीईटी दिली, पण प्रवेश मिळाला नाही ही सीईटी दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी २१ अाॅगस्ट ते २२ अाॅगस्टदरम्यान स्पाॅट अॅडमिशन घेण्याची सूचना परिपत्रकात केेली अाहे. पीजी-सीईटीसाठी शुल्क भरले त्याचप्रमाणे स्पाॅट अॅडमिशनसाठी अालेल्या, पण पीजी-सीईटी दिलेल्यांनी अाॅनलाइन ३०० अाणि २०० रुपये शुल्क भरणे अनिवार्य केले अाहे. सीईटीची उपयोगिता संपल्यामुळे ते शुल्क परत करणे गरजेचे अाहे. 

पुन्हा कोलमडले पीजी प्रवेशाचे वेळापत्रक 
पूर्वीच्यावेळापत्रकानुसार १० अाॅगस्ट रोजी स्पाॅट अॅडमिशन दिले जाणार होते. अाता २१ अाणि २२ अाॅगस्ट रोजी दिले जातील. अाॅगस्ट रोजी पहिली यादी जारी केली जाणार होती. ती यादीही दहा दिवस उशिरा (११ अाॅगस्ट रोजी) जाहीर करून १५ अाॅगस्टपर्यंत प्रवेश दिले जाणार होते. ऑगस्टएेवजी दुसरी यादीही दहा दिवस लांबली. या यादीनुसार १६ ते २० अाॅगस्टदरम्यान प्रवेश नक्की करावा लागणार अाहे. दोन्ही याद्यांनुसार प्रवेश झालेले नाहीत किंवा पीजी-सीईटी दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांना २१ ते २२ अाॅगस्टदरम्यान स्पाॅट अॅडमिशन दिले जाईल. महाविद्यालय किंवा विभागात अाता २३ ते २६ अाॅगस्टपर्यंत उपस्थिती नोंदवायची आहे. 

प्रवेशाची सद्य:स्थिती 
- १८,६०० पीजी-सीईटीदिलेल्यांची संख्या 
- २१,९८१ प्रथमवर्षाच्या उपलब्ध जागा 
- १९ जुलैला या वृत्ताद्वारे प्रवेशातील गोंधळ समोर आणला होता. 
- ७० पीजीअभ्यासक्रम 
- १२७ पीजीकाॅलेजेस 
- ४८ विद्यापीठाचेपीजी विभाग 
बातम्या आणखी आहेत...