आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एवढे चांगले वकील व्हा की मुंबईतून वकील आणण्याची गरजच पडू नये: डॉ. मंजुला चेल्लूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यातील वकिलांनी प्रॅक्टिससाठी मुंबई उच्च न्यायालयात येण्याची गरज नाही. मंुबई उच्च न्यायालय ओव्हरलोड होत आहे. जे ज्ञान मुंबईत मिळते तेच औरंगाबादेतील खंडपीठात मिळते याची मला खात्री आहे. मराठवाड्यातील वकिलांनी मंुबईत येण्यापेक्षा औरंगाबाद खंडपीठात प्रॅक्टिस करावी. इतके चांगले वकील व्हा की मंुबईचा वकील आणण्याची गरज पडू नये. जनतेला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर यांनी केले. खंडपीठामागील जागेत वकील संघासाठी पाचमजली चंेबर तयार होणार आहे. त्याचे भूमिपूजन डॉ. चेल्लूर यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती नरेश पाटील, औरंगाबाद खंडपीठातील प्रधान न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, न्या. भूषण गवई, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर. एम. देशमुख, सचिव अॅड. अभयसिंह बायस, उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र सानप यांच्यासह औरंगाबाद खंडपीठातील सर्व न्यायमूर्तींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अॅड. पूनम बोडखे, तर आभारप्रदर्शन अॅड. अभयसिंह बायस यांनी केले. या वेळी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची विशेष उपस्थिती होती. राष्ट्रगीताने सांगता झाली. 


मराठवाड्यात खूप चांगली माणसे 
डॉ. चेल्लूर म्हणाल्या, मराठवाड्यात खूप चांगली माणसे आहेत. न्यायमूर्तीच्या रूपाने मी ते सतत अनुभवते. ते केवळ न्यायमूर्तीच नाहीत तर त्यांच्यात मी चांगल्या व्यक्तीही पाहते आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्या. नितीन सांबरे यांचे काम चांगले आहे. न्यायमूर्ती घुगे हे उत्तम क्रिकेटपटू तर आहेतच, पण त्यांचे इथले कामही गतिमान आहे. मराठवाड्यातून मुंबईत आलेले ज्येष्ठ न्यायमूर्ती नरेश पाटील यांचे सहकार्य लाभते. औरंगाबाद शहरातून आलेले माझ्या कार्यालयाचे प्रधान सचिव एस. एन. जोशी हेही मराठवाड्याच्या लोकांसाठी आग्रही असतात. 

बातम्या आणखी आहेत...