आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांनंतरही लायसन्स मिळण्याची शाश्वती नाही !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डिसेंबर २०१४ पासून आरटीओतर्फे ऑनलाइन लायसन्स पद्धत सुरू करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे दलालांवर आळा बसेल असे वाटले होते. मात्र, तसे झालेले दिसून येत नाही. ऑनलाइन लायसन्ससाठी नोंदणी केल्यानंतर किमान चार महिने वाट पाहावी लागत आहे.
लायसन्स काढण्यासाठी WWW.SARTHI.NIC.IN या वेबसाइटवरून ऑनलाइन नोंदणी करावी लागते. त्यानंतर चार महिन्यांनी नोंदणी केलेल्या व्यक्तीचा नंबर येतो तो परीक्षेसाठी. त्यानंतर पुढील महिन्यात स्पीड पोस्टद्वारे लायसन्स घरपोच मिळते. इतक्या मोठ्या कालावधीमध्ये नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत आरटीओंकडे विचारणा केली असता, आमच्याकडे कर्मचारी नसल्याने विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरटीओ आणि दलालांची मिलीभगत
ऑनलाइन पद्धतीमुळे दलालांना आळा बसेल असा समज काही मंडळींना होता, मात्र आरटीओ आणि दलाल हे तुटणारे समीकरण असल्याने त्याचा फारसा फरक या दलालांवर पडलेला दिसत नाही. रात्री बारानंतर हे दलाल त्यांच्या ग्राहकांची नोंदणी करतात. दिवसातून फक्त १०० लोकांचीच नोंदणी आरटीओ ऑफिसकडून करण्यात येते. यामुळे सर्वसामान्य लोकांची नोंदणीच अनेकदा होत नाही. तसेच वेबसाइट हँग होणे या नेहमीच्याच त्रासाला सामोरे जावे लागते. चुकून एखाद्या व्यक्तीचा नंबर परीक्षेसाठी आलाच, तर पास झाल्यानंतर त्याला मिळणारे लायसन्स स्पीड पोस्टामार्फत घरी पोहोचवले जाते. मात्र, अनेकदा हे लायसन्स घरी पोहोचतच नाही.
नागरिकांनाच आरटीओ ऑफिस, पोस्ट ऑफिसमध्ये चकरा माराव्या लागतात. कधी कधी तर पोस्टमनला शोधण्याची वेळही नागरिकांवर येते.
आरटीओ ऑफिसमध्ये आजच्या तारखेला २० इन्स्पेक्टर रेकॉर्डवर आहेत. मात्र, प्रत्यक्षात फक्त तीनच इन्स्पेक्टर कार्यालयात कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी ११ इन्स्पेक्टर कार्यरत होते, त्यातील जणांच्या बदल्या झाल्यामुळे ही दयनीय परिस्थिती झाली आहे. या जणांच्या बदल्यांनंतर परभणीवरून इन्स्पेक्टरच्या बदल्या औरंगाबाद आरटीओमध्ये करण्यात आल्या आहेत; मात्र हे दोन्ही अधिकारी बदली झाल्यापासून वेगवेगळ्या सबबी सांगून रजेवरच आहेत. त्यांना या कार्यालयात काम करण्याची इच्छा नसल्याने ते सुटी घेत असल्याचे समोर आले आहे.
सध्या कार्यरत असलेले अधिकारी, त्यांच्यावर असलेला कामाचा ताण यामुळे उशीर होत असल्याचे आरटीओंनी मान्य केले आहे. आणखी अधिकारी मिळाले तर आमच्यावरील कामाचा ताण हलका होईल आणि लायसन्ससाठी लागणारा वेळही कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
कामाचा ताण आहे
- आमच्याकडे पाहिजे तेवढा अधिकारी वर्ग नाही. तसेच नोंदणी केलेल्यांतील ३५ टक्के लोक परीक्षेला येतच नाहीत. सध्या आम्ही १४० जणांची एका दिवशी परीक्षा घेतो. तसेच कार्यालयात नवीन संगणक सिस्टिम बसवण्याचे कामदेखील सुरू आहे. सध्या कामाचा प्रचंड लोड असल्याने आम्हाला यात बदल करणे कठीण आहे.
गोविंद सैंदाणे, आरटीओ
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ऑनलाइन अपॉइंटमेंटची पद्धत...