आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1983 पासून डोकेदुखी: कचरा डेपोवर स्मार्ट सिटीच्या बैठकीत आज निर्णय अपेक्षित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
छाया : अरुण तळेकर

औरंगाबाद- मांडकी शिवारात तत्कालीन नारेगावच्या बाजूला १९८३ पासून मनपाने कचरा डेपो तयार करून ठेवला आहे. त्यात अद्यापपर्यंत ३० लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कचरा आहे. त्यात शहरातील रोजच्या ३५० टन कचऱ्याची भर पडत आहे. यामुळे पंचक्रोशीतील गावच्या जमिनी खराब झाल्या असून पाण्याचे आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. स्मार्ट सिटी योजनेत घनकचरा व्यवस्थापन हा प्राधान्यक्रमाचा विषय असून त्यासाठी निधीही राखीव आहे. गुरुवारी होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत नारेगाव कचरा डेपो आणि घनकचरा व्यवस्थापनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. 

 

मांडकीसह पंचक्रोशीतील नागरिकांचा २४ वर्षांपासून लढा 
१९९३ पासून मांडकी गावासह पंचक्रोशीतील नागरिक कचरा डेपो हटवण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. न्यायालयाने हा कचरा डेपो हटवण्याचे स्पष्ट आदेश देऊनही त्यावर महापालिकेने काहीच कारवाई केल्यामुळे गेल्या महिन्यात नागरिकांनी मनपाच्या कचऱ्याच्या गाड्या बंद करून आंदोलन सुरू केले होते. दुसऱ्या दिवशी यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांची समजूत घालून चार महिन्यांची मुदत घेतली होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात येथे कचरा टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मनपाकडून कचरा डेपो हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...