आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थिंग, ईएसबी तंत्रज्ञानच वाचवेल संसारोपयोगी उपकरणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात वीज गळती चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. उघडे ट्रान्सफॉर्मर यामुळे विजेच्या दाबावर नियंत्रण ठेवणारे अॅल्युमिनयम प्लग वितळून ग्राहकांना क्षमतेपेक्षा शंभर केव्हीए व्होल्टेजने वीज पुरवठा होतो.
 
या उच्चदाबाला नियंत्रित करण्यासाठी ७० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांकडे अर्थिंग ईएसबी तंत्रज्ञान बसवलेले नाही. परिणामी त्यांचे संसारोपयोगी उपकरणे जळून मोठे आर्थिक नुकसान होते. शिवाय शॉक लागून अपंगत्व जीवित हानीचा धोकाही कायम आहे. शुक्रवारी बालाजीनगरमधील नाथनगरात अचानक विजेचा दाब वाढून टीव्ही, सेटटॉप बॉक्स, वाॅशिंग मशीन, फॅनसह वीज मीटरही जळाले आहेत.
 
विद्युत उपकरणांचा अचानक स्फोट झाल्याने शेकडो कुटुंबीय भयभीत झाले होते. शिवाय अंधारात राहावे लागल्याने मानसिक त्रासही झाला. या मागील कारण शोधले असता ट्रान्सफाॅर्मरवर विजेचा दाब न्यूटल करणारे फ्यूज फेल झाल्यामुळे विजेचा दाब वाढल्याचे उघड झाले, तर ग्राहकांनी हा दाब नियंत्रणासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याचे समोर आले. 
 
शहरातील ७० टक्के म्हणजे तीन लाख ग्राहकांपैकी लाख ७० हजार वीज ग्राहकांनी प्रॉपर अर्थिंग इलेक्ट्रॉनिक सर्किट ब्रेकर बसवले नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले. 

हाय होल्टेजचा धोका : शहरातील विद्युत वाहिन्या जीर्ण झालेल्या आहेत. दोन खांबांमधील वाहिन्यांना जागोजागी जोड देण्यात आले आहेत. बहुतांश रोहित्र उघडे आहेत. अनेक ठिकाणी वाहिन्या जमिनीकडे झुकल्या आहेत. वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित होणे, कमी अधिक दाबाने वीज मिळते. विशेष म्हणजे ग्राहकांच्या संख्येनुसार रोहित्र नाहीत. रोहित्रातील उपकरणांची देखभाल दुरुस्ती वेळेत केली जात नाही. विजेची मागणी १०० मेगावॅट असताना त्यापेक्षा कमी जास्त पुरवठा होणे आदी कारणांमुळे हाय व्होल्टेजचा धोका कायम आहे. 
 
तंत्रज्ञानाचा फायदा-तोटा : अर्थिंगईएसबी उपकरण बसवल्यास वीज पुरवठा सुरू असताना उघडी वायर, थ्री पिन, उपकरणे किंवा घराच्या पत्र्यावर हात लागला तर विजेचा धक्का लागून मनुष्य फेकला जातो. विद्युत पुरवठाही काही क्षणात बंद पडतो, पण याचा अभाव असल्यास अवघ्या पाच मिनिटांत जीवित हानी उपकरण जळून खाक होतात. पावसाळ्यात वीजपुरवठा कमी अधिक होण्याचे प्रमाण प्रचंड असते. हे ओळखून ग्राहकांनी उपाययोजना करून घ्याव्यात, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले. 

शुक्रवारी नाथनगरात जळाली उपकरणे 
हाय व्होल्टेजमुळे नाथनगरात टीव्ही ९८, फ्रिज ४७, सेटटॉप बॉक्स ५९, सीएफएल १०६, फॅन ३४, वाॅशिंग मशीन ४, इन्व्हर्टर १, संगणक ४, कूलर २, बायोमेट्रिक एमसी अशा प्रकारे उपकरणे जळाली. विद्युत निरीक्षक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा अहवाल पाठवण्यात येणार असून पुनर्तपासणी होईल. त्यानंतर नुकसान भरपाईचा निर्णय अपेक्षित आहे.
 
उपाययोजना करायलाच हवी 
-प्रत्येक ग्राहकांनी प्रॉपर अर्थिंग ईएसबी तंत्रज्ञान सुरक्षा कवच बसवून घ्यावे. ईएसबी केवळ ६० ते ८० रुपयाला मिळते. आर्थिंगला फारसा खर्च येत नाही. यासाठी जनजागृती केली जाईल. बी.एम. कुमावत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता. 
बातम्या आणखी आहेत...