आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या शैक्षणिक संधीत वाढतेय विषमतेची दरी! युनेस्कोच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतात शैक्षणिक वातावरणात आणि  शैक्षणिक संधींमध्ये विषमता वाढत चालली असून उच्च शिक्षणापर्यंत पोहोच नसणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ  होत चालली आहे. ही दरी रुंदावत आहे. दर्जेदार शिक्षण संस्थांचे शुल्क अधिक असल्यामुळे व्यक्तीच्या खर्च करण्याच्या क्षमतेनुसार त्याला आता शिक्षण मिळत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष युनेस्कोच्या ‘ ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट’मध्ये काढण्यात आला आहे. 
 
युनेस्कोच्या या अहवालात जगातील शैक्षणिक वास्तव मांडण्यात आले आहे. भारतातील ३६ राज्यांत नमुना अध्ययन करून हा निष्कर्ष काढण्यात आला असून येथील शिक्षण पद्धतीतील त्रुटींवरही बोट ठेवले आहे. वाढते शिकवणी शुल्क  व प्रवेश  शुल्क यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेत दरी निर्माण झाली आहे. भारतात  गुणवत्ता तपासणीसाठी मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत असलेल्या पात्रता चाचण्यांचे (प्रवेशपूर्व परीक्षा)  निकष दोषपूर्ण आहेत. त्यामुळे  शिक्षण व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत आहे. वंचित  घटक शिक्षण व्यवस्थेपासून दुरावला जात आहे, असे हा अहवाल सांगतो.
 
२६७२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
गुणवत्ता  चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढत आहे. या तणावातच परीक्षेत नापास झाल्याने २०१५ मध्ये  भारतातील २६७२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे राष्ट्रीय गुन्हे अहवालातून स्पष्ट झाले आहे.  खासगी  शिकवणींमुळे विद्यार्थ्यांत ताण-तणाव वाढतो. त्याचा कौटुंबिक बजेटवरही परिणाम होत आहे.
 
हेच खरे शैक्षणिक वास्तव
खासगी शिक्षण व्यवस्थेमुळे गरीब-श्रीमंत दरी  शिक्षणात आली. दुर्गम भागात शिक्षक अनुपस्थित राहतात. ज्या शिक्षण विभागाने शिक्षकांचे मॉनिटरिंग करायचे, ते होत नसल्याने ही वेळ आली. शाळेत नीट शिकवले जात नाही म्हणून गुणवत्ता  पडताळणीसाठी प्रवेशपूर्व परीक्षा घ्याव्या लागतात.  
- हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ
 
पुढील स्‍लाईडवर पहा, महाराष्ट्र व अन्य पाच राज्यांत  अशी स्थिती... 
बातम्या आणखी आहेत...