आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday SPL: न पाहिलेले नाथाभाऊ: पाहा, एकनाथ खडसे यांचे हे 10 खास फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. पुण्यातील जमीन प्रकरण, दाऊदशी फोनवर कथित संभाषण आदी प्रकरणांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण अजूनही खान्देशात त्यांचा राजकीय प्रभाव दिसून येतो. वाढदिवसानिमित्त आम्ही घेऊन आलोय, त्यांचे काही खास दुर्मिळ फोटो....
राज्‍याच्‍या राजकारणात भारतीय जनता पक्षात प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर राजकीय नेते म्हणून एकनाथ खडसे यांचे नाव आदराने घेतल्‍या जात होते. मात्र, त्यांना राजीनामा द्यावा लागले. एकदा पुन्हा ते राज्याच्या राजकीय पटलावर दिसून येतील अशी शक्यता आहे.
नाथाभाऊ हे विधीमंडळ राजकारणात 1990 पासून आहेत. सरपंच झाल्यानंतर अवघ्‍या तीन वर्षांत ते मुक्ताईनगरचे आमदार झाले. सलग 6 वेळा ते विधानसभेवर निवडून आले. राज्‍यातील भाजपाने ज्‍येष्‍ठ नेते म्‍हणून त्‍यांच्‍याकडे पाहिले जाते. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी पाच वर्षे ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. आक्रमक आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व हे त्यांचे वैशिष्ट. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला नाथाभाऊंचे असे काही फोटो दाखवणार आहोत. जे कादाचित आपण पाहिले नसतील.
नाथाभाऊ यांना आपण राजकीय व्‍यासपीठावर ब-याचदा पाहिले आहे. मात्र या संग्रहात काही विशेष फोटो आपल्‍याला पाहायला मिळतील.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, न पाहिलेले नाथाभाऊ....
बातम्या आणखी आहेत...