आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत प्रथमच स्वतंत्र मतदान यंत्रांचा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या  १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गट व गणांच्या मतदान प्रक्रियेसाठी स्वतंत्र मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांनी दिली. आयोगाकडून प्रथमच स्वतंत्र मतदान यंत्रांचा वापर करण्यात येत आहे.
  
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना  निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी संदिपान सानप व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुमन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य प्रशिक्षक प्रमुख धोंडिरामसिंह राजपूत यांनी गुरुवारी प्रशिक्षण दिले. यासाठी मतदान अधिकारी दोन व तीनची वाढलेली कर्तव्ये व जबाबदारी याबाबत प्रशिक्षण दिले असून जिल्हा परिषदांचा निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या निर्वाचक गणांसाठी मतदाराना वेगवेगळ्या मतदान यंत्रांवर मतदानाचा हक्क बजावावा लागणार आहे, असेही राजपूत यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...