आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाख रुपयांच्या वीजबिलांचा गठ्ठा बेवारस; तंत्रज्ञ निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- तालुक्यातील हिवरखेडा (नांदगीर) येथील वीज ग्राहकांचे तब्बल एक लाख रुपयांच्या जवळपास दोनशे वीजबिल गठ्ठा बेवारस अाढळून आले.  यानंतर चौकशीअंती वरिष्ठ तंत्रज्ञास निलंबित करण्यात आले आहे.

हिवरखेडा, नांदगीर येथील गावांचे महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ गुलाब संपत जाधव कार्यरत होते. गावातील विद्युत वितरण व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीची बिले ग्राहकांना वेळेत वाटून थकबाकी वसुलीची जबाबदारी त्यांच्यावर होती. कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार त्यांनी उपकार्यकारी अभियंता विजय दुसाने व सहायक अभियंता केतन थत्ते यांना चौकशीचे आदेश दिले.  आदेशानुसार  हिवरखेडा (नां.) येथे २८ जुलै रोजी तपासणी केली असता येथील हॉटेलमध्ये जवळपास दोनशे बिले ज्यांची रक्कम एक लाख रुपयांची बिले पडलेली आढळून आली. 

ग्रामस्थांनी दिलेल्या जबाबानुसार व पंचनाम्यानुसार जाधव मुख्यालयी राहत नसल्याचे व झीरो लाइनमन वापरत असल्याचे कळाले. त्यामुळे उपकार्यकारी अभियंता दुसाने यांनी जाधव यांना ९ आॅगस्ट रोजी महावितरण कंपनीच्या सेवेतून निलंबित केले. या आदेशामध्ये कामात निष्काळजीपणा करून बिले वितरित न केल्याने कंपनीच्या महसूल थकबाकी वाढीस कारणीभूत ठरणे, झीरो लाइनमन वापरणे, मुख्यालयी न राहणे, देखभाल व दुरुस्तीची कामे न करून महावितरण कंपनीची प्रतिमा मलीन करणे अशा गंभीर स्वरूपाचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रथमच या निलंबन प्रकाराच्या कारवाईमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी  अप्रिय कारवाई  करावी लागते, असे उपकार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...