आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज गळती औरंगाबादेत; बिलाचा भार राज्यावर! ५२ फीडरवर वीज गळती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात महावितरणचे ८३ फीडर आहेत. त्यापैकी ५२ फीडरवर ३४ ते ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वीज गळती होत आहे. जी राज्यात इतर कुठल्याच शहरात होत नाही. वीज सेवेवर याचा थेट परिणाम होत असून औरंगाबाद शहरात दरमहा १५ कोटी रुपयांची वीज गळती होत आहे. ही रक्कम महावितरण ग्राहकांवर बोजा टाकून वसूल करत आहे, तर राज्यात ५०० कोटींची वीज गळती होत आहे. याचा सर्वच गटांतील ग्राहकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. 

जीटीएलकडे वीज िवतरणाची जबाबदारी होती तेव्हा वीज गळतीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत होते. महावितरणने शहर वीज वितरणाचा कारभार हाती घेतल्यापासून त्यात २४ टक्क्यांनी वाढ होऊन ती जी मध्ये ७४ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. वीज चोरी, हानीचे प्रमाण जास्त असल्याने दर्जेदार अखंडित सेवेचा बोजवारा उडाला आहे. क्रांती चौक ते चिकलठाणा परिसरातील १४ हजारांवर विद्युत खांब, वाहिन्यांचे आयुष्यमान संपले आहे. वाऱ्याची झुळूक आली तरी वीजपुरवठा खंडित होतो. त्याचा दोन लाखांपेक्षा अधिक वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

सर्वाधिक भारनियमन मराठवाड्यात
 ७४टक्क्यांवर वीज गळती होत असल्याने नियमित वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना दर्जेदार अखंडित सेवा मिळत नाही. जेथे गळतीचे प्रमाण अधिक तेथे वीज पुरवठा जास्त खंडित होतो. ग्रामीण भागात तासांवर भारनियम केले जात आहे. अपघात, डीपी जळण्याचे प्रमाण अधिक आहे. पायाभूत सेवेची कामे वेळेवर होत नाहीत. महावितरणचे दरमहा ५०० कोटी याप्रमाणे वर्षाला सहा हजार कोटींचे नुकसान होत आहे. ही रक्कम वीज दरवाढ करून किंवा पायाभूत सुविधांसाठी ग्राहकांकडून अधिभार म्हणून वसूल केली जाते. औरंगाबादसह मराठवाड्यात सर्वाधिक भारनियमन केले जात आहे. 

गळती कमी करणे अत्यंत आवश्यक 
राज्यवीज नियामक आयोगाने सक्त आदेश देऊनही वीज गळती चोरीवर आळा घालण्यास महावितरण अपयशी ठरत आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात सर्वाधिक भारनियम होते. वीज हानी एक नुकसान तर वीज मिळत नाही म्हणून होणारे दुसरे नुकसान प्रचंड आहे. याचा महावितरणने गांभीर्याने विचार करून गळती थांबवल्यास मराठवाडा भारनियमनमुक्त होईल. -शरद चौबे, सदस्य, ऊर्जा मंच 

विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात 
परिमंडळात वीजचोरी, गळती थकबाकीचे प्रमाण जास्त आहे. त्यावर मात करण्यासाठी फीडरनिहाय पथक स्थापन करून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. सर्व फीडरवरील गळतीचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, औरंगाबाद परिमंडळ 

फीडरनिहाय वीज गळतीचा आलेख 
अ : ०-१८% : पाॅवरहाऊस साई, वाळूज घरगुती, सिडको एन-४, रामा, देवानगरी, दूध डेअरी 
ब: १८-२६ % : औरंगपुरा,सुरेवाडी, मयूरपार्क, शुभाश्री, राममंदिर, शारदा कॉल नी, टाऊन सेंटर, मयूरनगर, ११ केव्ही एन-१, चेतनानगर, गजानन मंदिर 
क: २६-३४ % :नक्षत्रवाडी,प्रिया कॉलनी, समर्थनगर, बसस्थानक, लेणी, कटकट गेट, म्हाडा कॉलनी, महावीर ब्ल्यू बेल्स, इंदिरानगर, सुहास कॉलनी, रंगमंदिर 
ड: ३४-४२ % :गोलवाडी,मिलिंद कॉलेज, सारा सिद्धी, देवगिरी व्हॅली, एन सिडको, रामनगर, गारखेडा परिसर, चाणक्यपुरी, जालना रोड, पैठण गेट 
इ: ४२-५० % :आयटीआय,नाथव्हॅली, रोजाबाग, आरती, सुभेदारी, भगतसिंगनगर 
फ: ५०-५८ % :एमआयडीसीनिर्लेप, होलिक्रॉस, कॅन्टोनमेंट, वसंत भवन, कोहिनूर, भीमटेकडी 
जी: ५८-६६ % :पेठेनगर,सिटी चौक, जकात नाका, चिकलठाणा, मोंढा 
जी: ६६-७४ % :राहुलनगर,मकबरा, पाणचक्की, रोशन गेट, नेहरू भवन, गणेश कॉलनी, औरंगाबाद टाइम्स कॉलनी, सिडको, संजयनगर, सेव्हन हिल्स 
जी: ७४ % :शहानूरमियाँदर्गा, सिटी चौक, ज्योतीनगर, दिल्ली गेट, दिशानगरी, देवळाई चौक, आयआरबी, रामगोपाल नगर, विद्यापीठ, जसवंतपुरा, अाझाद चौक, देवगिरी, मोरेश्वर, नारेगाव, निझामोद्दिन 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...