आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात पकडली 15 लाखांची वीजचोरी, 42 प्रकरणे महावितरणच्या पथकाने उघडकीस आणली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - शहरातील विविध व्यावसायिकांसह घरगुती ग्राहकांनी वीज मीटरमध्ये गडबड करून वीजचोरी करत असल्याचे ४२ प्रकरणे महावितरणच्या पथकाने उघडकीस आणली आहेत.जवळपास १५ लाखांची वीजचोरीचा प्रकार असल्याचे भरारी पथकाने स्पष्ट केले. या सर्व ४२ ग्राहकांचे विद्युत मीटर काढून जप्त केले आहे. हे पथक शहरातच ठाण मांडून बसले असल्याने  वीज ग्राहकांमध्ये खळबळ उडाली.  

केंद्र शासनाच्या आरएपीडीआरपी योजनेत वैजापूर शहराचा समावेश आहे. या योजनेत वीज गळती व चोरी कमी करण्यासाठी महावितरण कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च केले आहे. मात्र तरीही वीज गळतीचे प्रमाण ५० टक क्पेक्षा अधिक आढळून आल्याने वरिष्ठ कार्यालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शहर व परिसरातील वीज ग्राहक मीटरमध्ये आधुनिक पद्धतीने गडबड करून वीजचोरी करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांची दखल घेत मागील दोन दिवसांपासून ५ अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांचे पथक शहरात डेरेदाखल झाले आहे. या पथकाने शहरातील स्टेशन रोड परिसर, महाराणा प्रताप रोड, नाशिक रोड, येवला रोड, धनगर गल्ली, आदी भागातील वीज ग्राहकांची अचानकपणे तपासणी केली. त्यात हॉटेल व्यावसायिक व घरगुती ग्राहकांचे वीज मीटरची गती मंद असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे पथकाने तब्बल ४२ ग्राहकांचे मीटर काढून जप्त केले आहे. एका हॉटेलचालकाने तब्बल २ लाख रुपयांपेक्षा अधिकची वीजचोरी केली असल्याचे समोर आले आहे. या ४२ ग्राहकांनी अंदाजे १० ते १२ लाख रुपयांची वीजचोरी केली आहे. या ग्राहकांचे जप्त केलेल्या मीटरची तपासणी करून त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता भंगाळे, बुंदेले, सोनत, जाधव, बोराडे, उपअभियंता प्रकाश तौर, शहर अभियंता राधेशाम कुमावत, पवार, बी.एन.जोरे, मोतीलाल मापारी, बाबासाहेब लांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
बातम्या आणखी आहेत...