आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरगावच्या वीज उपकेंद्राचे काम अडीच वर्षांपासून अर्धवटच, उद््घाटन होऊन अडीच वर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव बाजार- सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथील ३३ केव्ही वीजनिर्मिती उपकेंद्राच्या कामाचे उद््घाटन होऊन  सुमारे अडीच वर्षांचा कलावधी झाला असला तरी देखील अजून येथील वीज उपकेंद्राच्या निर्मितीचे काम अद्याप अर्धवट स्थितीतच आहे. 

शनिवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी येथील वीज उपकेंद्राच्या अर्धवट कामाची पाहणी केली. आस्था ग्रामस्थांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. या वेळी गणेशकर यांनी येत्या चार, पाच दिवसांत येथील वीज उपकेंद्राच्या  कामाची सुरुवात करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी गावकऱ्यांना त्यांनी दिले होते. येथील ग्रामपंचायतीने  वीज उपकेंद्राच्या उभारणीसाठी नि:शुल्क जागा महावितरणला दिलेली आहे. या वेळी ग्रामस्थांनी संबंधित कंत्राटदारास दिलेले येथील काम त्यांच्याकडून काढून घेऊन दुसऱ्या कंत्राटदारास द्यावे, असे मागणी या वेळी गणेशकर यांच्याकडे केली होती. संबंधित ठेकेदार येथील वीज उपकेंद्राचे काम सुरू असल्याचे बनावट व्हॉट्सअॅप फोटो महावितरणच्या अभियंत्यांना पाठवून बिले उकळण्याचे काम करीत असल्याचा आरोप या वेळी ग्रामस्थांनी महावितरण मुख्य अभियंता गणेशकर यांच्याकडे केला होता. 

राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेतीसाठी बारा तास वीज देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. इतरत्र त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. मात्र येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे काम सुमारे अढीच वर्षांपासून प्रलंबित असल्याने शेतकरी पिकास वेळेवर पाणी देऊ शकलेले  नाहीत परिणामी परिसरातील शेतकऱ्यांची शेती उत्पन्नात मोठी घट झालेली असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केवळ महावितरणच्या गलथान धोरणामुळे झालेले असल्याचा आरोप परिसरातील शेतकरी करत आहेत.  

तर रस्ता रोको आंदोलन करणार 
मागच्या दोन वर्षांपासून महावितरण तसेच संबंधित ठेकेदार नुसतेच आश्वासन देत आहे. येत्या चार, पाच दिवसांत येथील वीज उपकेंद्राच्या कामाची सुरुवात झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
- दत्ता चव्हाण, शिवसेना उपतालुकाप्रमुख 
बातम्या आणखी आहेत...