आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेश प्रक्रिया : शिक्षण विभागानेच दिली विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने होत आहे. यात तांत्रिक बाबींमुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी, पालकांसह महाविद्यालयेही संभ्रमात आहेत. तो दूर करण्यासाठी शिक्षण विभागानेच विद्यार्थ्यांना सतावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यात १७ प्रश्न असून याद्वारे संभ्रम दूर करण्याचा शिक्षण विभागाने प्रयत्न केला आहे. 

 अशी आहेत प्रश्नोत्तरे
 १ प्रश्न – पहिल्या पसंतीचे कॉलेज मला मिळाले, प्रवेश घेणे बंधनकारक आहे काय ?
 उत्तर – होय प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
 
२ प्रश्न – दुसऱ्या,तिसऱ्या,चौथ्या,दहाव्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. मला प्रवेश घेणे बंधनकारक आहे काय ?प्रवेश न घेतल्यास मला पुढच्या फेरीत समाविष्ट होता येईल काय?
 उत्तर -  प्रवेश घेणे बंधनकारक नाही,पुढच्या फेरीत समाविष्ट होता येईल.
 
 ३ प्रश्न – पहिल्या पसंतीचे कॉलेज मला मिळाले आहे,परंतु मी विहित मुदतीमध्ये प्रवेश घेतला नाही तर मला पुढच्या फेरीत सहभाग घेता येईल काय ?
 उत्तर – नाही,पहिले पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
 
 ४ प्रश्न – पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले मी विहित मुदतीत प्रवेश घेतल्यानंतर पुढीलफेरीमध्ये सहभाग घेता येईल काय?
 उत्तर – नाही.
 
 ५ प्रश्न – एकदा प्रवेश घेतल्यास प्रवेश रद्द करता येईल काय व प्रवेश रद्द केल्यानंतर पुढच्या फेरीत सहभागी होता येईल काय?
 उत्तर – प्रवेश रद्द करता येईल, शाखा किंवा माध्यम प्रवेश हवा असल्यास बदलून हवी
असल्यास पुढच्या फेरीत सहभागी होता येईल, अन्यथा पुढच्या फेरीत सहभागी होता येणार नाही.
 
 ६ प्रश्न – मी ऑनलाइन अर्ज केलेला नाही, मला पुढील फेरीत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल काय ?
 उत्तर – होय.
 
 ७ प्रश्न – मला व्यवस्थापन कोटा/इनहाऊस कोटामधून प्रवेश मिळाला आहे, मी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत भाग घेवू शकतो काय?
 उत्तर – नाही.
 
 ८ प्रश्न – मला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळाला आहे. मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे, मला हा प्रवेश रद्द करुन व्यवस्थापन कोटा/इनहाऊस कोटा यामध्ये अर्ज करता येईल का?
 उत्तर – नाही करता येणार.
 
 ९ प्रश्न – मला पसंती क्रमांक २ कॉलेज मिळाले आहे, मी प्रवेश घेतला नाही,मला पुढील फेरीत परत सहभाग घेतला तर मला दुसरे माझ्या पसंतीचे कॉलेज न मिळाल्यास मला पहिल्या फेरीत मिळालेले पसंती क्रमांक २ चे कॉलेज मिळू शकेल काय?
 उत्तर – नाही.
 
 १० प्रश्न – पुढील फेरीत कॉलेजचा कटऑफ कमी होईल. की वाढेल?
 उत्तर- काहींचा वाढेल, काहीचा कमी होईल. (उपलब्ध रिक्त जागा व मागणी केलेल्या विद्यार्थ्यांचे गुण यावरुन कटऑफ कमी जास्त होऊ शकेल.)
 
 ११ प्रश्न – मला पहिल्या मेरीटलिस्टमध्ये ४ नंबरचे पसंतीक्रम कॉलेज मिळाले आहे, मी आता दुसऱ्या फेरीमध्ये सहभागीह होवू शकतो का? दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्या ३ पसंतीक्रमांकाचे कॉलेज नाही मिळाले तर पहिल्या फेरीत मिळालेले ४ नंबरचे पसंतीक्रमांक कॉलेजमध्ये प्रवेश घेवू शकतो का?
 उत्तर- प्रत्येक फेरी स्वतंत्र असल्यामुळे मागील प्रवेश विचारात घेतले जाणार नाही. नव्याने रिक्त जागाप्रमाणे नवीन अलॉटमेंट केले जाते.
 
 १२ प्रश्न – एटीकेटीचे प्रवेश कधी होणार ?
 उत्तर – जुलै २०१७ च्या निकालानंतर ज्या विशेष प्रवेशफेऱ्या होतील. तेव्हा आपल्याला प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल.
 
 १३ प्रश्न – मी प्रवेश घेतला आहे,मला नवीन शाखेत प्रवेश घ्यायचा आहे?
 उत्तर – शाखा व माध्यम बदलून नव्याने प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल, पसंतीक्रम नव्याने भरता येतील.
 
 १४ प्रश्न – मला घरापासूनचे दूरचे कॉलेज मिळाले आहे काय करावे?
 उत्तर –
शाखा व माध्यम बदलून नव्याने प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल, पसंतीक्रम नव्याने भरता येतील. नव्याने जवळच्या महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरावेत.
 
 १५ प्रश्न -  विनाअनुदानित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे, मला विनाअनुदानित मधून अनुदानित महाविद्यालयात प्रवेश घेता येईल का?
 उत्तर – प्रथम पसंतीक्रमाचे विनानअनुदानित कॉलेज मिळाल्यास आपणास बदल करता येणार नाही. प्रथम पसंतीक्रमांकाव्यतिरिक्त अन्य पसंतीक्रमांकाचे विनाअनुदानित कॉलेज मिळाल्यास प्रवेश न घेतल्यास पुढील फेरीसाठी आपण पसंतीक्रम बदलून अनुदानीत कॉलेजचीही मागणी करु शकता. तथापी उपलब्ध रिक्त जागा मागणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्येवरुन प्रवेश निश्चित होतील.
 
 १६ प्रश्न – कला,क्रिडा मार्क फॉर्म भरल्यानंतर वाढवून दिले आहेत, त्यात बदल करता येईल का? १० वी ची उत्तरपत्रिका फेर तपासणीत गुण वाढून आले तर फॉर्म मध्ये बदल करुन केंव्हा मिळेल ?
 उत्तर – एसएससी बोर्डाकडून विहित नमुन्यातील गुण वाढवून दिल्याचे पत्र शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर केल्यानंतर गुणात बदल करुन दिला जाईल.
 
 १७ प्रश्न – मी इयत्ता दहावी इतर बोर्डातून उत्तीर्ण झालो आहे, आमचे ग्रेडचे मार्कात रुपांतर
करुन कोठे मिळेल ?
 उत्तर - आपल्या ग्रेडचे मार्कात रुपांतर औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रातील देवगिरी ग्लोबल अकॅडमी भगीरथीनगर स्टेशनरोड पद्मपुरा आणि नाथव्हॅली उच्च माध्यमिक विद्याल कांचनवाडी येथून करुन दिले जाईल.
बातम्या आणखी आहेत...