आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगप्रसिद्ध वेरुळ लेणीमध्ये विदेशी पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; अनेक जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरुळ - जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये गुरुवारी पर्यटन करणाऱ्या जपानसह भारतातील इंदूर येथील पर्यटकांना आग्या मोहोळाच्या मधमाशांनी चावा घेतला. ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजता घडली.

वेरूळ येथे एकूण ३४ लेण्या असून यामधील बत्तीस नंबरच्या जैन लेणीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास जपान तसेच इंदूर येथून आलेला पर्यटकांचा समूह लेणी पर्यटन करत असताना या लेणीमध्ये असलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशा अचानकपणे पर्यटकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.

यामध्ये जपान येथून आलेले पर्यटक नाकामुरो, कथुसो कोकोवा, मसुआ इनाडा, मिसिको टकेउची, युकिओ मकिझाकी, आकिरा साफोमोटो यांच्यासह सोबत आलेले दिल्ली येथील मार्गदर्शक भीष्त, वेरूळ लेणीतील मार्गदर्शक सिद्धार्थ प्रधान यांच्यासह इंदूर येथून आलेल्या तीन पर्यटकांना या मधमाशांनी चावा घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला होता, तर या वेळी जखमींना तातडीने पुरातत्त्व विभागाचे संवर्धन सहायक आर. यू. वाकळेकर, लेणी पोलिस कर्मचारी हारूण शेख, योगेश नाडे यांनी मदत कार्य केले.
 
आरोग्य अधिकारी डॉ. पी. पी. सावंत यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. नंतर पुढील उपचारासाठी पर्यटक औरंगाबादला रवाना झाले.
 
पुढील स्लाईडवर पाहा, पर्यटक लेणी पाहातानाचे फोटो...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...