आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांकरिता मंदिराच्या विश्वस्तांसह प्रशासन जय्यत तयारीस लागले अाहे. या अनुषंगाने सोमवारी उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर यांच्या मार्गदर्शनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. 
 
बैठकीस तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड,  सरपंच साहेबसिंग गुमलाडू, उपसरपंचांसह सदस्य, माजी सरपंच बाबूराव काळे, प्रकाश पाटील, एकलव्य भिल्ल संघटनेचे नाना ठाकरे, पोलिस पाटील रमेश ढिवरे, प्रभारी गटविकास अधिकारी एच. बी. कहाटे , एपीआय कल्पना राठोड, तलाठी एन. बी. कुसनुरे, अन्न व औषधी प्रशासनाचे डॉ. राम मुंडे,
 
मंडळ अधिकारी आर. एस. जाधव, दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष गणेश हजारी, घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक शुक्ला, कार्यकारी विश्वस्त कमलाकर विटेकर, पुरातत्त्व विभागाचे जगन्नाथ काळे,  हाजी अल्लाउद्दीन शेठ, विजय भालेराव, दामूअण्णा गवळी, साहेबराव पांडव, विजय राठोड, उल्हास मिसाळ, नामदेव बकाल आदी  उपस्थित होते.बैठकीमध्ये स्वच्छता, सुरक्षा, यात्रोत्सव काळात येणाऱ्या दुकानांचे नियोजन करण्यात आले  आहे.
बातम्या आणखी आहेत...