आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, 1700 सफाई कामगारांचे सुरक्षेविना कचरा संकलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरभर कचरा संकलन व सफाईचे काम करणाऱ्या कामगारांना मनपाकडून गेल्या चार महिन्यांपासून सुरक्षेची साधने मिळालेली नाहीत. परिणामी त्यांना सुरक्षेविनाच कचरा उचलावा लागत असल्याने या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकवेळा तर यातून गंभीर दुखापत व आजार जडू शकतो. तथापि, भांडार विभागाकडून साहित्याची खरेदी रखडल्याची माहिती समोर आली आहे. 
 
शहरात कचरा संकलन आणि साफसफाई करण्यासाठी १७०० कामगार कार्यरत आहेत. या कामगारांना प्रत्येक तीन महिन्यांनी हँडग्लोव्हज, मास्क, गमबूट यांसह टोपली, झाडू आदी साहित्य दिले जाते. दिलेले साहित्य का वापरत नाही म्हणत मनपाने मागील वर्षी काही कामगारांना दम भरला होता. कुठल्याही सुरक्षेविना कचरा उचलल्यानंतर होणाऱ्या आजारांविषयी माहिती देऊन जनजागृतीही केली होती. मात्र, आता परिस्थिती नेमकी उलटी आहे. आता मनपाच हे साहित्य वेळेत देत नाही. पूर्वीचे साहित्य खराब झाल्याने या कामगारांना आता कुठल्याही सुरक्षेविना कचरा संकलन आणि सफाईचे काम करावे लागत आहे. याचा परिणाम या कामगारांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
 
सुरक्षा साधने नसतील तर...
मास्क, हँडग्लोव्हज, गमबूट न वापता कचरा संकलन, सफाईचे काम केल्यास कामगारांना श्वसनविकास, त्वचाविकार, फुप्फुसाचे  विकार  जडू  शकतात. पावसाळ्यात कचऱ्यात जिवाणूंचे प्रमाण अधिक असते. नाका-तोंडावाटे ते शरीरात गेल्यास संसर्ग होऊ शकतो. तसेच ग्लोव्हजशिवाय कचरा संकलन केल्यास त्वचाविकार होऊ शकतो.
 
कार्यालयाने वाऱ्यावर सोडले, नागरिकही साथ देईनात...
- एकीकडे मनपा कर्मचाऱ्यांकडे लक्ष देत नाही, तर दुसरीकडे ज्या लोकांचा कचरा हे सफाई कर्मचारी गोळा करतात त्या नागरिकांकडूनही वारंवार सांगूनही योग्य सहकार्य त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. 
- कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी मनपासह वेगवेगळ्या सामाजिक संघटना, संस्थांनी जनजागृती करूनही सरसकट कचरा साठवण्याची सवय सोडायला काही नागरिक तयार नाहीत. कचरा देताना ते सरसकट सर्व कचरा वर्गीकरण न करताच तो देत आहेत. 
- काही दिवसांपूर्वीच एका सफाई कामगाराच्या हाताला काच लागली होती. त्यामुळे बराच रक्तस्त्राव होऊन त्याच्या हाताला गंभीर जखम झाली होती. 
- वारंवार जनजागृती करूनही नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करीत नसल्यामुळेच अशा घटना घडत आहेत. त्यासाठी अशा नागरिकांंच्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे. 
-  याशिवाय बऱ्याचदा कचऱ्यामध्ये काचांसोबत इतर काही धारदार वस्तू असतात. त्यात कडक प्लास्टिकचे तुकडे, लोखंडी वस्तूंचे तुकडे असतात. जे खरोखर अत्यंत हानिकारक असतात. 
- सफाई कामगार जेव्हा टेंपोमध्ये हा कचरा घेऊन जातात, तेव्हा हाताळणीदरम्यान त्यांना अशा वस्तूंमुळे इजा होते. 
- एकंदरीतच मनपाचे दुर्लक्ष आणि नागरिकांच्या बेपर्वाईमुळे सफाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- ज्या भागात योग्य कचरा वर्गीकरण केले जाते. तेथे जाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आणि इतर भागातील काही नागरिकांनी पाहणी करावी. त्यातूनच सकारात्मक बदल घडू शकेल. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
> नागरिकांनो, असे करा वर्गीकरण
> पावसाळ्यात अधिक काळजी घेण्याची गरज
> काय म्हणतात जबाबदार...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...