आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी कर्मचाऱ्यांचे नुकसान, नंतर बसेल ग्राहकांनाच फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यशासनाने हॉटेलच्या बिलात अाकारला जाणारा सर्व्हिस चार्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे प्रारंभी ग्राहकांचा फायदा होणार असला तरी ही काही दिवसांतच खाद्य पदार्थांचे दर वाढवून हा चार्ज अप्रत्यक्षरीत्या वसूल होणार असल्याचे शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. 
 
सध्या शहरातील प्लस ग्रेडच्या सुमारे १६ हाॅटेलमध्येच बिलाच्या रकमेवर १० टक्क्यांपर्यंत, तर नॉन स्टारमध्ये ते टक्के सेवा शुल्क आकारले जाते. टीपची रक्कम थेट ग्राहकांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंतच पोहोचते. मात्र, हॉटेलातील इतरांना वेतनाशिवाय अन्य रक्कम मिळत नाही. यामुळे हॉटेल चालक सर्व्हिस चार्ज आकारतात. सर्व्हिस चार्जमधून जमा होणारी रक्कम महिनाअखेरीस सर्व कर्मचाऱ्यांमध्ये समान वितरित केली जाते. वेतनाशिवायचे हे प्रोत्साहनपर बक्षीस असते. आता राज्य शासनाने सर्व्हिस चार्जमध्ये ‘चालेल ग्राहकाची मर्जी’ असा निर्णय घेतला आहे. 

काहीचफरक नाही : औरंगाबादेत हॉटेलचालकांच्या दोन संघटना आहेत. औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनमध्ये परमिट रूमचालकांचा समावेश आहे, तर औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनमध्ये स्टार आणि प्लस ग्रेड दर्जातील २५ हॉटेलचा समावेश आहे. यापैकी रेस्टॉरंट वगळता अन्य १६ हॉटेलमध्ये हे सेवा शुल्क आकारले जाते. यापैकी एका हॉटेलचालकाने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, याचा फार परिणाम पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सरकारच्या निर्णयामुळे आम्ही बिलात सर्व्हिस चार्ज लावणे बंद करू. यामुळे बिलाच्या रकमेत काहीशी कपात होईल. पण याचा कर्मचाऱ्यांना उत्पन्नावर परिणाम पडणार आहे. कर्मचारी साहजिकच याचा विरोध करतील. हा फरक भरून काढण्यासाठी खाद्यपदार्थांचे दर वाढवावे लागतील. 

एका अन्य हॉटेल व्यावसायिकाने सर्व्हिस चार्जपैकी १५ टक्के रक्कम क्रॉकरी, कटलरीची तूटफूट आणि चोरी तसेच नॅपकिनचे नुकसान भरून काढण्यासाठी करत असल्याचे सांगितले. मात्र, शासनाने यावर बंदी आणल्यामुळे हे नुकसान भरून काढताना नाकी नऊ येणार आहे. यामुळे पदार्थाच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही ते म्हणाले. 
 
बातम्या आणखी आहेत...