आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमधून कोणी येईना तेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेतून भाजपमध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. अजूनही सेनेचे कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसते. इकडे प्रयत्न करूनही शिवसेनेत कार्यकर्ते थांबत नाहीत. शिवसेनेत उत्साह कायम आहे हे दाखवण्यासाठी आऊटगोइंग रोखण्याबरोबरच इनकमिंग वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. भाजपचे कार्यकर्ते आपल्याकडे येणार नाहीत तेव्हा अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणा, अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या असून याची जबाबदारी उपशहरप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. 

उप शहरप्रमुखांनी वाॅर्डावाॅर्डांत बैठका घेऊन तेथील सामाजिक कार्यकर्त्यांची यादी तयार करावी अन् नंतर स्थानिक नेत्यांशी त्यावर चर्चा करावी, असे सांगण्यात आले आहे. याचे परिणाम लवकरच दिसून येतील, असा दावा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. अलीकडच्या काळात कोणतीही निवडणूक नाही. त्यामुळे पक्षांतर्गत खलबतेही नाही. तरीही कार्यकर्ते भाजपमध्ये मोठ्या संख्येने जात असल्याने स्थानिक नेत्यांनी आता कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. दुसरीकडे भाजपमध्ये मोठ्या संख्येने अन्य पक्षातील कार्यकर्ते दाखल होत असल्याने जुने भाजपवासीय नाराज आहेत. त्यांनी आमच्याशी संपर्कही केला आहे, परंतु आम्ही पद देऊ शकत नाही. आमची पदसंख्या ठरलेली आहे. भाजपसारखे कोणीही पक्षात आले की द्या त्याला पद, असे आम्ही करू शकत नाही, असेही दानवे यांनी म्हटले आहे. ]

पक्षाची प्रतिमा उंचावेल 
वाॅर्डा-वाॅर्डांतील लहान-मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पक्षात आणल्यास त्याचा भविष्यात फायदा होईल. दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांमुळे पक्षाची प्रतिमाही चांगली होईल, असे सेनेच्या नेत्यांना वाटते. त्यामुळेच त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...