Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» News About Exact Drink By Car; 1.50 Lacks Of Cash Seized

औरंगाबाद- चक्क कारमधून दारूविक्री; दीड लाखाचा साठा जप्त

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 08:02 AM IST

औरंगाबाद-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गावरील दारूविक्री बंद झाल्यापासून अवैध दारूविक्रीसाठी एकाहून एक मार्ग शोधले जात आहेत. अशीच शक्कल लढवत कारमधून दारूविक्री करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले. चितेगाव- पैठणखेडा रस्त्यावर बुधवारी ही कारवाई करण्यात आली. या कारमधून लाख ५० हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, महामार्गावर दारूबंदी लागू झाल्यापासून ते २० एप्रिल यादरम्यान विभागाने ११ लाख हजार ९०३ रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करत ३२ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
गंगापूर विभागाचे निरीक्षक शरद फटांगडे १९एप्रिल रोजी पथकासह गस्तीवर होते. चित्तेगाव- पैठणखेडा मार्गावर एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कारची (एमएच २० एजी ९२३०) थांबवून तपासणी केली असता त्यात दारूच्या १८० एमएलच्या ५७६ बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी वाहनचालक रितेश बापूसाहेब पहिलवान आणि शेख कलीम शेख पाशा यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Article

Recommended