आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट नोटा प्रकरण: भय्याजी सापडेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महापालिका निवडणुकीच्या काळात एप्रिल रोजी २४ हजारांच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना पोलिसांनी पकडले होते. या प्रकरणात आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. बनावट नोटांचे हे रॅकेट आंतरराज्यीय रॅकेट असून सव्वा महिना उलटला तरी यातील उत्तर प्रदेशमधील मास्टरमाइंड भय्याजी अजून पोलिसांच्या हाती लागला नाही.
गुन्हे शाखेच्या पथकाने एप्रिल रोजी सायंकाळी बनावट नोटा प्रकरणात सय्यद मोहसीन सय्यद मीर (२५, रा. खडकपुरा, जालना) आणि दुसऱ्या दिवशी शेख बशीर पाशा सिकंदर याला अटक केली होती. सय्यद मोहसीन हा गुलमंडी परिसरात फिरत होता. चिल्लर सामानासाठी तो हजाराची नोट काढून दुकानदाराला देत होता. दुकानदाराने ती नोट नकली असल्याचे बघून परत केली. तसेच याबाबत गुन्हे शाखेला माहिती दिली होती.
मोहसीन हा गुलमंडी परिसरातच उत्तम मिठाईजवळ फिरत होता. पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली असता त्याच्याकडे हजार रुपयांची एक आणि पाचशेच्या वीस बनावट नोटा आढळून आल्या. सर्व नोटा एकाच क्रमांकाच्या होत्या. मोहसीनने या नोटा जालन्यातील मित्र शेख बशीर पाशा सिकंदर याच्याकडून आणल्याची कबुली दिली होती. बशीरही जालन्याचाच रहिवासी असल्यामुळे त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने तेथून अटक केली होती. आणखी तीन आरोपींनाही अटक करण्यात आली. यात भोकर येथील भीमराव झिने, शेख चाँद शेख रसूल, उत्तर प्रदेशमधील अन्वा येथील देवीसिंग निमराडे यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...