आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ पर्यटनस्थळी होणार आधुनिक थाई बुद्ध विहार, दोन महिन्यांत विहार होणार खुले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थाई बुद्ध विहाराच्या जागेवर व्यापारी मकरंद आपटे यांनी विहाराचे प्रमुख डॉ. पी. खुमसरन व भदन्त डॉ. जीवक बोधी यांचे पूजन करून आभार मानले. - Divya Marathi
थाई बुद्ध विहाराच्या जागेवर व्यापारी मकरंद आपटे यांनी विहाराचे प्रमुख डॉ. पी. खुमसरन व भदन्त डॉ. जीवक बोधी यांचे पूजन करून आभार मानले.
वेरूळ - जगप्रसिद्ध अजिंठा- वेरूळ लेणीसह पर्यटन नगरीत पर्यटनास येणाऱ्या देश-विदेशातील बौद्ध समाजाच्या साधूंसह पर्यटक, स्थानिकांच्या ध्यानधारणेसह पूजापाठाकरिता वेरूळ लेणीपासून अवघ्या दोन किमी अंतरावर आधुनिक थाई बुद्ध विहार उभारणीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांत हे विहार  सर्वांकरिता खुले होणार आहे.   

वेरूळ येथे १२, अजिंठा येथे  ३०, औरंगाबाद येथे ९, पितळखोरा (कन्नड) येथे १४ बौद्ध लेण्या असून याचबरोबर देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा, पाणचक्कीसह विविध पर्यटनस्थळांना भेटी देण्याकरिता वर्षभरात देश-विदेशातून लाखो बौद्ध पर्यटकांसह साधू औरंगाबाद जिल्ह्यात येतात. यामध्ये थायलंड, जापान, कोरिया, श्रीलंका, व्हिएतनाम, इंडोनिशिया, कंबोडियासह अनेक देशांचा समावेश आहे.  यामध्ये सर्वात मोठी संख्या ही थायलंड देशाच्या पर्यटक, साधूंची आहे. परंतु या साधूंना, पर्यटकांना येथे आल्यावर या लेण्यांच्या सान्निध्यात ध्यानधारणेसह पूजापाठ व विविध धार्मिक कार्याकरिता कोठेही आधुनिक विहार उपलब्ध होत नव्हते. विहार उपलब्ध व्हावे म्हणून वेरूळ येथील भदन्त डॉ. जीवक बोधी, एम.बी.बी.एस. डी.पी.एच, ए.एफ.एम.सी.(पुणे) यांनी वेरूळ लेणीपासून अवघ्या दोन किमीवर सोलापूर- धुळे महामार्गालगत असलेली आपली पाच एकर शेती वॉट थाई एलोरा बुद्धगुहा ट्रस्टला दान दिली आहे. आता या ठिकाणी बुद्धगया, नालंदा, बनारस, खुशीनगर, श्रावस्ती, लुंबिनीसह विविध बौद्ध धर्मीयांच्या ठिकाणी असलेल्या बुद्ध विहाराचे प्रमुख व मूळचे थायलंडचे डॉ. फरमाहा खुमसरन यांनी खुशीनगरच्या धर्तीवर वेरूळ येथे आधुनिक थाई बुद्ध विहार बनवण्याच्या कामास प्रारंभ केला आहे. या संपूर्ण कामाकरिता लागणारा निधी हा थायलंड देशातून येणार असून जिल्हाभरात येणारे देशी- विदेशी बौद्ध साधू व पर्यटक या ठिकाणी ध्यानधारणा करतील. या बुद्ध विहाराचे काम मधुकर वाघमारे करत आहे.  या वेळी डॉ. शिवकुमार त्रिपाठी, स्थानिक व्यापारी मकरंद आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.   
 
पर्यटनवाढीसह निसर्ग सौंदर्यावर राहणार भर
- बुद्धगया, नालंदा, बनारससह खुशीनगरच्या धर्तीवर आम्ही वेरूळ येथे थाई बौद्ध विहार बनवत असून याकरिताचा निधी हा थायलंड देशातून येणार असला तरी जगभरातील पर्यटक या ठिकाणी येऊन याचा लाभ घेतील  सरकारच्या मदतीने जगभरामध्ये  केंद्र उभारणार आहोत. 
- डॉ. फरमाहा खुमसरन, प्रमुख   
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...