आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीचे पैसे दिले नाहीत तर जीव द्यावा लागेल, कर्मचारी म्हणतात 20 हजार द्या.. लगेच बिले काढतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव अर्ज - मी आधीच चार मुलींचे लग्न केले आहे. यातच मला ही विहीर मिळाली. मला आनंद झाला. परंतु मी गेल्या पाच वर्षांपासून पैशांची प्रतीक्षा करीत आहे. दुकानदाराचे पैसे व्याजाने काढून विहीर खोदली. व्याजाचे पैसे वाढत आहेत. पैसे लवकर नाही मिळाले तर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असा टाहो फुलंब्री तालुक्यातील गणपती नामदेव डकले यांनी फोडला.  
 
दरम्यान, डकले यांच्यासारखे अनेक शेतकरी सध्या विहिरींच्या देयकांच्या प्रतीक्षेत असून पंचायत समितीच्या खेट्या मारूनही प्रशासन गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही. तर विभागातील काही कर्मचारी वीस हजार रुपये द्या, लगेच तुमचे बिल काढून देतो, अशी मागणी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर  ज्या कर्मचाऱ्यांवर आराेप केले आहे त्यांना नोटिसा बजावल्या. तालुक्यात एकूण ८५ विहिरीचे े पैसे बाकी होते. त्या पैकी ४५ विहिरींचे  साधारण ४४ लाख अदा करण्यात आले आहे. अद्याप ४० विहिरींचे ४० लाख रुपये देणे बाकी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
 
फुलंब्री तालुक्यातील  बोरगाव अर्ज परिसरातील रोजगार हमी योजनेंतर्गत  शेतकऱ्यांनी चार-पाच वर्षांपूर्वी विहिरी खोदलेल्या असतानादेखील या मधील कुशल (बांधकाम) ची देयके साधारण सव्वा कोटी रुपये थकले असून अद्यापही मिळाले नसल्याने या बिलासंदर्भात शेतकऱ्यांनी पं.स.कडे बिलाची मागणी केली अनेक वेळा पंचायत समितीमध्ये चकरा मारत आहे.  व्याजाने पैसे काढून दुकानदाराचे पैसे द्यावे लागल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यात आणखीनच भर ही वीस हजार द्या तेव्हा बिल निघेल, अशी मागणी पंचायत समितीचे रोजगार हमी कर्मचारी करीत असल्याचा अारोप लाभधारक शेतकरी करीत आहेत.   
 
बोरगाव अर्ज परिसरात सन २०११/१२ या वर्षात काही शेतकऱ्यांना, तर २०१२/१३ या वर्षी काही शेतकऱ्यांना  विहिरींची मंजुरी मिळाली होती.  शासनाकडून यासाठी प्रत्येकी २,९९००० (दोन लाख नव्याण्णव हजार) अनुदान देण्यात येते. त्यानुसार शेतकऱ्यांनी विहिरीचे कामदेखील पूर्ण केले आहे. या शेतकऱ्यांना २ लाख ९९ हजार लाभ मिळणे आवश्यक आहे. मात्र यापैकी शेतकऱ्यांना १ लाख ५० हजारांच्या आसपास बिले मिळाली आहेत. उर्वरित  बिले विहिरीचे काम पूर्ण होऊन चार-पाच वर्षांचा कालावधी लोटला असतानादेखील मिळाले नाहीत. दुकानदाराकडून अनेकांनी या पैशाच्या भरवशावर उधारीने सिमेंट लोखंड विकत घेतले होते.  अनेकांनी व्याजाने पैसे काढून पैसे भरले आहेत. यामुळे ते कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत.
 
आठ दिवसांत बिले द्या, अन्यथा उपोषणाला बसू
- या कामाची अर्धवट बिले निघालेली आहेत. मात्र उर्वरित बिलासंदर्भात पंचायत समितीकडे वेळोवेळी मागणी करूनही याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. पंचायत समितीचे कर्मचारी हे शेतकऱ्यांना वीस हजारांची मागणी करताहेत, असे अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितले आहे. आठ दिवसांत जर शेतकऱ्यांना बाकीचे बिल नाही दिले तर पंचायत समितीच्या आवारात उपोषणाला बसणार आहे.
- किशोर बलांडे, जिल्हा परिषद सदस्य
 
पैसे न मिळाल्यास आत्मदहन करीन
- मला २०१२/१३ मध्ये रोहयोेतून विहीर मंजूर झाली होती. खोदकामाचे पैस मिळाले परंतु, बांधकामाचे एक लाख रुपये  मिळाले नाहीत. मी व्याजाने पैसे काढून सिमेंट व लोखंडाचे पैसे दिले. या विहिरीमुळे मी कर्जबाजारी झालो आहे. मी वीस हजार रुपये दिले नसल्याने  पैसे देण्यास टाळाटाळ होत आहे.  आठ दिवसांत  पैसे मिळाले नाहीत तर मी पं.स.च्या आवारात आत्मदहन करीन. 
- रघुनाथ सांडू बलांडे,  लाभार्थी शेतकरी
बातम्या आणखी आहेत...