आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन ४५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- येथील गोलअंबा वस्तीवरील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने अांब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी, दि.३ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.  चांद्रभान रंगनाथ नागरे (४२) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
  
चांद्रभान नागरे यांचे जुन्या तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गोलअंबा वस्तीवर गट क्रमांक ३१२ मध्ये शेतजमीन आहे. नागरे यांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत गहू पिकाला पाणी भरले. त्यानंतर याच गटात असलेल्या एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा पुतण्या अशोक याने पाहिल्यानंतर सर्वत्र आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. या घटनेची माहिती प्रकाश नागरे यांनी फुलंब्री पोलिस ठाण्याला दिल्यानंतर काही वेळेतच पोलिस उपनिरीक्षक मनीषा लटपटे, पोहेकाॅ. बी. बी. शेख आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
बातम्या आणखी आहेत...