आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जुन्या देवळीतील सुलतानाबाद शिवारात रविवारी सकाळी उघडकीस आली.  रफीक शब्बीर शेख (३५) असे आत्महत्या केल्याचे नाव आहे. खूप वेळ झाला तरी रफिकने दरवाजा उघडला नाही म्हणून आवाज दिला, प्रतिसाद मिळत नसल्याने  दरवाजा तोडला असता गळफास घेतल्याचे दिसून आले. आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आल्हाट यांनी तपासून मृत घोषित केले. 
बातम्या आणखी आहेत...