आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी : धनादेशाऐवजी रोख द्या; व्यापारी : बँकेतून रोखच मिळेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर  - कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून कांदा खरेदीनंतर सरसकट रोख रक्कम मिळावी ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी व्यापाऱ्यांनी मंगळवारी धुडकावून लावल्यामुळे कांदा खरेदी केंद्रावर मंगळवारी दुपारी मोठा गोंधळ उडाला होता. व्यापारी शेतकऱ्यांकडील शेतमाल खरेदी केल्यानंतर आर्थिक व्यवहारापोटी रोख रक्कम न देता धनादेश हाती सोपवत असल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी कांदा खरेदी केंद्राचे मुख्य गेट बंद करून कांदा लिलाव अर्धा तास रोखला होता. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, व्यापारी विरुद्ध शेतकरी यांच्यात रोख रकमेच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाचा समेट सभापतींसह संचालकांनी मध्यस्थीमुळे घडून आला. दरम्यान, कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी बाजार समितीला शेतकऱ्यांना रोख रक्कम हाती सोपवणे शक्य नसल्याचे निवेदन दिल्यामुळे संचालक मंडळाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.   

नोटाबंदीच्या निर्णयामुळे बाजार समितीच्या आवारात नोंदणीकृत व्यापारी शेतमालाची खरेदी करताना नवीन चलनाच्या रोकडटंचाईमुळे शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे त्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याच्या निर्णयावर शेतकऱ्यांनी रोख रक्कम देण्याची मागणी कित्येक दिवसांपासून लावून धरली होती. बाजार समितीच्या संचालक मंडळाकडे ही  शेतकऱ्यांनी रोख रकमेचा आर्थिक व्यवहार व्यापाऱ्यांनी सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बाजार समितीचे  सभापती काकासाहेब पाटील, संचालक ज्ञानेश्वर जगताप, रावसाहेब जगताप, दिगंबर खंडागळे, सुरेश तांबे, कैलास बोहरा, सचिव व्ही. डी. शिनगर यांनी कांदा खरेदी केंद्रात प्रश्नावर बैठक घेतली होती. या बैठकीत सभापतींसह संचालकांनी शेतकऱ्यांकडील माल खरेदीनंतर  रोख रक्कम देण्याच्या मुद्द्यावर व्यापारी वर्गाने बँकेकडून अपेक्षित रोख रक्कम मिळत नसल्यामुळे शेतमाल रोख स्वरूपात खरेदी करणे शक्य नसल्याचे ठणकावून सांगितल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याशी वाद झाला. बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करून लिलावासाठी रोखून धरले होते. दरम्यान, किमान पाच हजारांपुढील रोख रक्कम असल्यास धनादेशाद्वारे व्यवहार करण्याची मागणीही व्यापाऱ्यांनी धुडकावत बाजार समितीला निवेदन दिले. दरम्यान, संचालक मंडळ या निवेदनावर काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 
शेतकरी म्हणतात... आठ आठ दिवस रकमेची प्रतीक्षा   
व्यापारी शेतमाल खरेदी केल्यानंतर आठ दिवसांनंतर बँकेचा धनादेश सोपवतात. मात्र सदरील धनादेश बँकेत जमा केल्यानंतर बँकेच्या अंतर्गत व्यवहारात २० ते २५ दिवस वटत नसल्यामुळे आर्थिक टंचाईची झळ सोसावी लागत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा,
व्यापारी म्हणतात... रोकड मिळत नसल्याने अडचण
- अनुदान वाटप घोटाळा; तलाठ्यांना नोटीस...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  
बातम्या आणखी आहेत...