आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची दडी : शेतकऱ्यांच्या गोंधळाने दुसऱ्या दिवशीही तूर खरेदी बंद पाडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - मंगळवारी तूर खरेदीच्या पहिल्या दिवशीही तुरीच्या आर्द्रतेच्या कारणाने मागील परंपरा कायम राहिल्याने आज दुसऱ्या दिवशीही बाजार समितीने तूर खरेदी बंद ठेवली.  त्यामुळे ४२७ शेतकऱ्यांच्या ७ हजार ७७४ क्विं. तुरीचा प्रश्न कायम राहणार असे दिसते.  
 
राज्यभरातील तूर पुन्हा दोन महिन्यांनंतर खरेदी करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. दोन महिन्यांपूर्वी टोकन मिळालेले शेतकरी तुरी घेऊन बाजार समितीत आले, मात्र एकाही शेतकऱ्याची तूर १२ टक्के आर्द्रतेपेक्षा कमी न भरता ती १३ ते १७ या निकषात आल्याने खरेदी करता आली नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. आज दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थिती राहणार असे दिसल्याने बुधवारी बाजार समितीने तूर खरेदी केंद्र बंद ठेवत जिल्हा उपनिबंधकांकडे तुरीची आर्द्रता वाढल्याने ती खरेदी करता येणार नाही.
 
मार्गदर्शनाची प्रतीक्षा   
९२ दिवसांत ४२ दिवसच तूर खरेदी केंद्र सुरू राहिले. अद्याप मोठ्या संख्येत शेतकऱ्यांची तूर शिल्लक असून येथील केंद्र यापूर्वी ९२ दिवसांपैकी ४२ दिवसच सुरू राहिले हाेते. ३१ आॅगस्टपर्यंत तूर खरेदी होणार असून बाजार समितीने आर्द्रता असलेली तूर खरेदी करायची की नाही याचे मार्गदर्शन मागितले अाहे. 
 
४१ हजार क्विंटल तुरीची खरेदी
यापूर्वी  २२ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. यात ४१ हजार ६९ शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली तरीही अद्याप पैठण तालुक्यातील ४४७ शेतकऱ्यांकडे ७ हजार ७२७ क्विंटल तूर शिल्लक आहे. आता तूर खरेदी सुरू झाली असली तरी आर्द्रतेच्या मुद्द्यावरून तूर खरेदी बंद पडली आहे.
 
मूर्ख बनवत आहेत
शेतकऱ्यांना सरकार मूर्ख बनवत आहे, दोन महिने तूर खरेदी बंद ठेवली व जाचक निकष लावले. या दोन महिन्यांत तुरीची तीच आर्द्रता कशी राहील? दोन दिवसांत तूर खरेदी केली नाही तर आंदोलन करण्यात येईल.  
- संजय वाघचौरे, माजी आमदार
 
..त्यानंतर खरेदीविषयी निर्णय घेऊ
 
>सध्या विक्रीसाठी आलेल्या तुरीत जास्त आर्द्रतेचे प्रमाण आहे व ही तूर नवीन निकषात बसत नसल्याने खरेदी करता येत नाही.  याचे मार्गदर्शन वरिष्ठांकडे मागितले आहे. ते आल्यानंतर तूर खरेदी करायची की नाही हे ठरविले जाईल. याची सर्वांनी दखल घ्यावी. 
- नितीन विखे, सचिव, बाजार समिती 
बातम्या आणखी आहेत...