आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनी परत द्या म्हणत शेतकऱ्यांचे उपोषण, अाश्वासनानंतर घेतले मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजी- भाकरी भरवत शेतकरी कुटुंबीयांचे उपोषण सोडवले. (छाया : ज्ञानेश्वर दवंगे) - Divya Marathi
आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजी- भाकरी भरवत शेतकरी कुटुंबीयांचे उपोषण सोडवले. (छाया : ज्ञानेश्वर दवंगे)
पिशोर - मागील ७५ वर्षांपासून वडिलोपार्जित वनजमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या  वनजमिनी वन विभागाने कारवाई करत परत घेतल्याच्या कारणाने काही शेतकरी कुटुंब भारंबा शिवारातील गट नंबर ११८ मध्ये उपोषणास बसले होते. आमदार जाधव यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत भाजी-भाकरी देत उपोषण सोडवले.  
 
भारंबा तांडा येथील दगडवाडीतील शेतकरी आपल्या कुटुंबासह बुधवारपासून उपोषणाला बसले होते. पिशोर पोलिस ठाण्याचे सपोनि अभिजित मोरे व वनक्षेत्रपाल अनिल रहाणे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन उपोषण न करण्याबाबत विनंती केली. मात्र शेतकऱ्यांनी मागणी धुडकावत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे कारवाई करत वन जमिनी ताब्यात घेतल्या होत्या त्या  जमिनी परत आमच्या ताब्यात देण्यात याव्या  तेव्हाच उपोषण मागे घेण्यात येईल, असा पवित्रा घेतला. दि. १४ रोजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांनी दिलेल्या  अाश्वासनानंतर  तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांनी आमदार जाधवांच्या हाताने भाजी-भाकरी खात उपोषण मागे घेतले.  
बातम्या आणखी आहेत...