आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive : मराठवाड्यात पाच महिन्यांत तब्बल 361 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या पाच महिन्यात तब्बल ३६१ शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आहेत. चांगला पाऊस, धरणे भरल्यानंतरही शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबत नसल्याची स्थिती आहे. एकीकडे बंपर तुरीचे पीक, कापसाचे चांगले उत्पादन झालेले असतांना मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत.
 
 
गेल्या वर्षी २०१६ मध्ये मे अखेर ४७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या तुलनेत शेतकरी आत्महत्या कमी झाल्या असल्या तरी दररोज दोनपेक्षा आधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात होतांना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मराठवाड्यात गेल्या २९ महिन्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा २५४७ इतका झाला आहे. 
 
२९ महिन्यात २५०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या  : मराठवाड्यात गेल्या अडीच वर्षात २५४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.  १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५ पर्यत विभागात ११३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या वर्षात १०५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या दोन वर्षात २१८६ शेतकऱ्यांनी आणि या पाच महिन्यातल्या ३६१ असे २५४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.  
 
८६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित :
मराठवाड्यात १ जानेवारी २०१७ ते २८ मे २०१७ पर्यत बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात २३१ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले असून २२५ लोकांना मदत मिळाली आहे. तर ४४ आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. मराठवाड्यात ८६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. 
 
बीड आत्महत्येचे केंद्र : बीड जिल्हा शेतकरी आत्महत्येचे केंद्र बनला आहे. यावर्षी पाच महिन्यात बीडमध्ये ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर गेल्या दोन वर्षात बीड जिल्ह्यात ५२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये २०१५ (३०१) आणि २०१६ (२२२) शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 
 
तज्ज्ञ म्हणतात, शेतकरी विराेधी धाेरणाचा परिणाम
व्यापार पूर्ण बसला  
- यावर्षी पाऊस चांगला झाला असला तरी शेतकऱ्यांच्या हाती पैसा आलाच नाही. व्यापार पुर्ण बसला असून उत्पादन चांगले झाले असले तरी शेतमालाला भाव मिळालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसे आलेच नाही.  
- मानवेंद्र काचोळे, शेतकरी अभ्यासक
 
विरोधी धोरणाचा परिणाम  
^बीडमध्ये सर्वाधिक सिंचन गेवराईमध्ये आणि सर्वाधिक आत्महत्या गेवराईत. त्यामुळे केवळ सिंचन वाढले की आत्महत्या थांबतात असे नाही. गेल्या अनेक वर्षाचा तो परिणाम आहे. शेतकऱ्यांना जिवंत असतांना मदत करण्याची गरज आहे.  
-अमर हबीब, शेतकरी अभ्यासक
 
पुढील स्लाइडवर वाचा, मे अखेरची तीन वर्षातली  स्थिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...