आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांनो, खुर्च्या सोडा, शेतात जाऊन पाहणी करा : कृषीमंत्री भडकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी बाळापूर गावाचा दौरा केला. मात्र, या वेळी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांसमोरच साऱ्या व्यथा मांडला. मंत्री आले म्हणून अधिकारी आले. एरवी शेतकऱ्याकडे बघायला कोणी तयार नाही. बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान झाले. कापसाला भाव नाही, गावातल्या डीपीची वीज कापली आहे. मग आत्महत्या नाही तर काय करायचे, असा सवाल शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना केला. त्यावर सदाभाऊ खोत यांनीदेखील कृषी अधिकाऱ्यांचीही खरडपट्टी काढली. अधिकाऱ्यांनो, केवळ ऑफिसमध्येच बसू नका. खुर्च्या सोडा, शेतात जा, असे सांगत अधिकाऱ्यांना दम भरला. 


जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर सदाभाऊ खोत यांनी बाळापूर गावाला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत जिल्हा कृषी अधीक्षक एस. जी. पडवळ, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह कृषी विभागाचे जिल्ह्यातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बोंडअळीच्या बाबतीतही नुकसानीची माहिती ऑनलाइन घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर शेतकरी म्हणाले, सर्वच गोष्टी ऑनलाइन करता, कर्जमाफी ऑनलाइन, अजून आमच्या हाती काही नाही. गावात डीपीची वीज कापली आहे. कापसाला भाव नाही, त्यामध्येही ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...