आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फौजदारी जनहित याचिकाच फिर्याद गृहीत धरून गुन्हे दाखल करा; कोर्टाचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लातूर जिल्हा परिषदेच्या २६२ बोगस तुकड्या वाटप प्रकरणात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी दाखल फौजदारी जनहित याचिकाच फिर्याद असल्याचे गृहीत धरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. सदर देशाविरोधात संस्थाचालकांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. प्रकरणात न्या. एस. एस. शिंदे व न्या. मंगेश एस. पाटील यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली असता शिक्षण व क्रीडा खात्याच्या प्रधान सचिवांना उत्तर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.    


लातूर येथील याचिकाकर्ते विठ्ठलराव भोसले यांनी ३ डिसेंबर २०१२ रोजी बोगस तुकड्यांविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. प्रकरणात शासनाने लातूरच्या विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव शिशिर घनमोडे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालात प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. समितीने दिलेल्या अहवालाआधारे हायकोर्टात दाद मागण्यात आली होती. पण गुन्हे दाखल करण्यात आले नाही.    
याप्रकरणी भोसले यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. प्रकरणात १८ अधिकारी व संस्थाचालकांची सीबीआय चौकशी करावी. दोषी अधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या पगार पोटी खर्च झालेली सरकारी रक्कम वसूल करावी व गुन्हा दाखल करावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. अॅड. रामराव बिरादार यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली.


प्रकरणात ३ आॅगस्ट रोजी सुनावणी झाली असता खंडपीठाने सदर याचिकाच फिर्याद म्हणून गृहीत धरावी व लातूर शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करावे, असे आदेश दिले होते. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता. पण सदर अर्ज न्यायालयाने निकाली काढला होता. त्यानंतर आता पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे. भोसले यांची बाजू अॅॅड. रामराव बिरादार यांनी मांडली.

बातम्या आणखी आहेत...