आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगरुळात दोन घरांना आग, दीड लाखाचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना- सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथे गुरुवारी (६ ऑगस्ट) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन घरांना आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने जीवित हानी झाली नसली, तरी घरातील साहित्य व कपड्यांनी घेतलेल्या आगीत सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

मंगरूळ येथे गाववस्तीतील सतीश संपत ढोरमारे व वंदनाबाई सुभाष ढोरमारे यांच्या घरात लावलेला दिवा उलटल्याने मध्यरात्री आग लागून दोन घरे खाक झाली. त्यात घरातील मौल्यवान वस्तूंसह कपड्यांनी पेट घेतल्याने मोठे नुकसान झाले. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. घटनेचा पंचनामा सज्जाचे तलाठी सूरज गिरी यांनी केला.