आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्निशमन प्रमाणपत्रांची मनपा पडताळणी करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात असल्याचे प्रमाणपत्र मिळवलेल्या आणि ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही अशा सर्व एक हजार ८२ पेक्षा जास्त व्यावसायिकांच्या प्रमाणपत्रांची इमारतींची प्रत्यक्ष चौकशी करण्यात येणार आहे. त्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, रॉकेल, फटाका दुकान, पेट्रोल पंप आदींचा समावेश आहे.
मनपाकडून तयार करण्यात आलेल्या यादीनुसार एक हजार ८२ मोठे व्यावसायिक इमारती असलेल्या वास्तूंना मनपाने फायर एनओसी दिली आहे. त्यापैकी किती जणांनी प्रमाणपत्र नूतनीकरण केले याची माहिती मनपाकडे नाही. त्यामुळे मनपाच्या अग्निशमन विभागाने आता पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, लॉज, केरोसीन विक्रेते, फटाके दुकानदार, मंगल कार्यालये, मोठ्या इमारती आणि पेट्रोल पंप मालकांना नोटिसा देऊन ना हरकत प्रमाणपत्रांचे नूतनीकरण केले आहे की नाही याची पाहणी करणार आहे. फटाका दुकानांना लागलेल्या आगीनंतर प्रशासनाने जागे होत ही कारवाई सुरू केली आहे. मनपाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेली ४१८ हॉटेल्स, १४२ रेस्टॉरंट्स, ७६ लॉज, १८ केरोसीन दुकानदार, फटाके दुकानदार, १६ मंगल कार्यालये, ३५७ मोठ्या इमारती आणि ५२ पेट्रोल पंप यांना नोटिसा बजावल्या जातील.
बातम्या आणखी आहेत...