आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर: आगीत 2 हजार क्विंटल कापूस जळून खाक; 1 कोटीचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- गंगापूर-वैजापूर रोडपासून जवळच असलेल्या किसान अग्रो इंडस्ट्रीजमध्ये कापसाच्या गंजीला वाहनातील सायलेंसरच्या ठिणगीमुळे शुक्रवारी दुपारी आगीमध्ये दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

येथील किसान अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये ठेवलेल्या सात हजार क्विंटल कापसाच्या गंजीनजीक सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कापूस भरण्यासाठी ट्रक आला होता. या ट्रकच्या सायलेंसरची ठिणगी गंजीमधील कापसाला लागल्याने कापसाने पेट घेतल्याने वरच्या भागातील कापसाला मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच इंडस्ट्रीजमधील कर्मचारी परिसरातील शेतकरी, पोलिस नागरिकांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचे स्वरूप मोठे असल्याने औरंगाबाद येथून मनपाच्या अग्निशामक दलाचा बंब पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने दुपारी दोन वाजता आग आटोक्यात आल्याची माहिती इंडस्ट्रीजचे संचालक शरद गांधी अण्णासाहेब माने यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...