वाळूज- पिंपरखेडमधील नर्सरीतून लॉनसाठीची हिरवळ शहरात घेऊन जाण्यासाठी भरलेल्या मालासह घरासमोर टेम्पो उभा केला होता. हा उभा केलेला टेम्पो अचानक रात्रीच्या वेळी आगीत सापडला. आगीमुळे टेम्पोची केबिन इंजिनचा संपूर्ण भाग जळून खाक झाला. हा संशयास्पद प्रकार वाळूजच्या अण्णाभाऊ साठेनगरात मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास घडला. सुदैवाने जीवितहानी टळली. कारण हा टेम्पो ज्या ठिकाणी जळत होता, त्यालगतच महावितरणचा वीजपुरवठ्याचा ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या बाजूने नागरी वसाहत अाहे.