आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा अग्नितांडव होता होता वाचले, जिल्हा परिषद मैदानावरील प्रदर्शनामध्ये सिलिंडरने घेतला पेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग विझविल्यानंतर स्टाॅलधारकांनी सारवासारव केली. - Divya Marathi
आग विझविल्यानंतर स्टाॅलधारकांनी सारवासारव केली.
औरंगाबाद- दिवाळीच्या वेळी फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीची अजून चौकशीही पूर्ण झाली नाही तोच मंगळवारी दुपारी दोन वाजता मोठे अग्नितांडव होता होता वाचले. जिल्हा परिषद मैदानावरील प्रदर्शनामध्ये खाद्यपदार्थांच्या १८४ क्रमांकाच्या दुकानातील गॅस सिलिंडरने पेट घेतला. काहींची धावपळ सुरू झाली. पण सुदैवाने अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी असल्यामुळे काही मिनिटांतच आग आटोक्यात आली.
 
या मैदानावर जिल्हा परिषदेकडून महिला बचत गटांचे स्वयंसिद्धा प्रदर्शन सुरू आहे. मार्च रोजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विभागीय आयुक्त डाॅ. पुरुषोत्तम भापकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उदघाटन झाले. प्रदर्शनात एका बाजूला खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत. पण प्रशासनाने आठ दिवसांसाठी येथे अग्निशमन दलाचे पथक तैनात केलेे आहे. ड्यूटी ऑफिसर शरद घाटेशाही, एन. के पठाण, सुभाष गरत, अशोक खोतकर यांनी घटनास्थळी धाव घेत गॅस सिलिंडरचा उपयोग करत केमिकल ड्राय वापरून ही आग विझविली. या घटनेत वृद्ध किरकोळ भाजला आहे. 

फायर ऑडिटचे काय ?
मैदानावर २५० स्टॉल आहेत. संपूर्ण मंडप कपड्याचा आहे. एका पडद्याने पेट घेतला असता तर संपूर्ण मंडपने काही क्षणात पेट घेतला असता. या वेळी स्टॉलधारक आणि ग्राहक मिळून ५०० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे अशी कुठली घटना घडली तर बाहेर जाण्यासाठी आपत्कालीन मार्ग नाही. अग्निशमन गाडी आत जाऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. तरीदेखील या प्रदर्शनाला एनओसी मिळाली आहे. या घटनेचे वृत्त समजल्यावरही मनपाचा वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आला नाही. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...