आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांच्या चिमुकलीवर औरंगाबादेत अतिप्रसंग, नातेवाईकांचा ठाण्यासमोर ठिय्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गारखेडा परिसरात एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. वेळीच मुलीच्या आईच्या नजरेस हा प्रकार पडताच आरडाओरड केल्यामुळे अज्ञात नराधम पसार झाला. आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव एकत्र आला होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 
 
रविवारी दुपारी अडीच वाजता मुलगी अंगणात खेळत असताना आईला तिचा रडण्याचा आवाज आला. ती घराबाहेर आली आणि बघितले काय तर एक लांब केसाचा माणूस तिच्यासोबत बळजबरी करत तोंडात प्लास्टिकची पिशवी कोंबत होता. आई जोरात ओरडली आणि त्याच्यावर दागडफेक सुरू केली. हा प्रकार पाहून नराधम पळून गेला आणि चिमुकलीची त्याच्या तावडीतून सुटका झाली. 
 
आईचा रौद्र अवतार पाहून शेजारी गोळा झाले. मुलीला काही झाले काय याची शहानिशा केली असता तिच्या गालावर नराधमाने ओरखडे मारले होते. जमावाने मुलीच्या आईला धीर दिला आणि तत्काळ पोलिसांत धाव घेतली. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, गजानन मनगटे, हनुमान शिंदे आदींनी घटनास्थळी भेट दिली. 
 
या भागातील वातावरण काही वेळासाठी तंग झाले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी देताच जमाव शांत झाला. निरीक्षक अशोक मुदीराज यांचे पथक रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध घेत होते. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...