आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यामधील शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना ठरली तारणहार; 57 हजार टन धान्याचे वाटप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शेतकऱ्यांना दुष्काळात ऑगस्ट २०१५ पासून शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना लागू करण्यात आली होती. दुष्काळी भागातल्या १४ जिल्ह्यांत ही अन्नसुरक्षा योजना यशस्वीरीत्या राबवली आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत तब्बल तीन लाख ५७ हजार टन धान्य शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. या माध्यमातून मराठवाड्यातल्या ३६ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे योजना एकीकडे बंद करण्याचे संकेत दिले जात असले तरी या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे.   


मराठवाड्यात अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना  तीन रुपये किलो दराने तांदूळ आणि २ रुपये किलो दराने गहू देण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळत आहे.   

 

दुष्काळात शेतकऱ्यांना मिळाला आधार

२०१५ मध्ये एकीकडे शेतीचे उत्पन्न नाही. खरीप आणि रब्बीचा हंगामही हातून गेल्यानंतर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील मोठ्या प्रमाणात होत होत्या.  मात्र या आर्थिक ओढाताणीमध्ये शेतकऱ्यांना दोन रुपये किलो दराने गहू मिळत असल्यामुळे अन्नधान्य सुरक्षा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होताना पाहायला मिळत आहे.  यावर्षी पुन्हा मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत आहे. या अंतर्गत नांदेड, औरंगाबाद  जिल्ह्यात सर्वाधिक धान्य वाटप करण्यात आले आहे.    

असे झाले धान्याचे दोन वर्षांत वितरण

ऑगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या वर्षात  १ लाख ५७ हजार ९९६ टन धान्याचे वाटप करण्यात आले. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये १ लाख ९९ हजार ०८८ टन धान्याचे वाटप झाले. दोन वर्षांत आतापर्यंत ३ लाख ५७ हजार ०८४ टन धान्य वाटप करण्यात झाले. यामध्ये ३६ लाख ०६ हजार २६५ शेतकऱ्यांना लाभ झाला. यात भारतीय अन्न महामंडळातर्फे गहू २३४४ रुपये प्रतिक्विंटल  तर तांदूळ ३२६६ प्रतिक्विंटल या दराने खरेदी केले. मात्र शेतकऱ्यांना गहू दोन रुपये व तांदूळ तीन रुपये किलोने विकण्यात आले.   

 

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक झाले वितरण   
या योजनेअंतर्गत २०१६ ते २०१७ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात ६ लाख ८७ हजार ९९१ शेतकऱ्यांना ३५६८६ टन धान्य वाटप करण्यात आले आहे, तर २०१५ मध्ये ३१४१४ टन धान्य वाटप करण्यात आले आहे, तर औरंगाब ाद जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार ७ शेतकऱ्यांना २०१६-१७ अंतर्गत २९६८१ टन आणि २०१५-१६ अंतर्गत २५ हजार ४४४ टन धान्य वाटप करण्यात आले आहे.    

 

 योजना चालू राहिली पाहिजे   
२०१२ पासून मराठवाड्यातल्या शेतीचे कंबरडे मोडले.  त्यामुळे दुष्काळात ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे  शेतकऱ्यांवर हे धान्य घेण्याची वेळ आली. सर्वांना धान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना स्वामिभान दुखावला जात असला तरी शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची असून चालू राहिली पाहिजे.   
- कैलास तवार, मराठवाडा प्रमुख शेतकरी संघटना

बातम्या आणखी आहेत...