आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9व्या वर्षी कपाटावर लिहिले ‘वन्स, अाय विल प्ले वर्ल्ड’, आता फिफा वर्ल्डकपमध्ये खेळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वयाच्या नवव्या वर्षी त्याने ‘वन्स, अाय विल प्ले वर्ल्ड’ या अाेळी हाेस्टेलमधील कपाटावर लिहिल्या. डाेक्यात फक्त फुटबाॅलचा विचार असायचा. त्यामुळे ताे फुटबॉल उशाशी घेऊन झोपायचा. याच जिद्दीतून त्याने ८ वर्षांत फिफा वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे स्वप्न साकार केले. हा प्रेरणादायी प्रवास आहे कोल्हापूरच्या ध्येयवेड्या १७ वर्षीय फुटबाॅलपटू अनिकेत जाधवचा. ६ ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.   

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आजपर्यंत संताेष ट्राॅफीसह इंडियन सुपर लीग, अाय लीग व इतर क्लबच्या फुटबाॅल स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवली. अनिकेत मात्र  फिफा वर्ल्डकपमध्ये खेळणारा महाराष्ट्राचा पहिला खेळाडू ठरला आहे. अनिकेत हा पुण्याच्या क्रीडा प्रबाेधिनीत घडला. मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या क्रीडा मार्गदर्शक जयदीप अंगीरवाल यांनी या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम केले. प्रबाेधिनीच्या इतिहासातील अधोरेखित करणारे हे यश अाहे. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर अनिकेतने वर्ल्डकपच्या तयारीसाठी अातापर्यंत २७ देशांचा दाैरा केला. विदेशातील मैदानांवर प्रतिभेची चुणूक त्याने दाखवून दिली. त्याने अातापर्यंत ७ गाेल नाेंदवले अाहेत. 

तिसऱ्या संधीत स्वप्नपूर्ती
भारतीय संघाची निवड करण्यासाठी देशभरात शोधमोहीम सुरू होती. प्रशिक्षक जयदीप यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेतने पुणे, मुंबईतील निवड चाचणीत सहभाग घेतला. यात तो अपयशी ठरला. त्यानंतर घरच्या मैदानावर म्हणजेच कोल्हापुरात त्याने संधीचे सोने केले. भारतीय संघात निवड झालेला तो महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे.

फ्री किक मारण्याचे काैशल्य वाखणण्याजाेगे
क्रीडा प्रबोधिनीतील आठ वर्षांत त्याने मैदानावरचे प्रत्येक बारकावे शिकले. अाॅलराउंडर म्हणून खेळी करण्याची प्रचंड प्रतिभा त्याच्यात अाहे. त्याच्या डाव्या अाणि उजव्या पायात वादळी वाऱ्यासारखा प्रचंड वेग अाहे. चेंडू चिकटवल्यागत त्याच्याच पायात असताे. याशिवाय फ्री किक मारण्याचे काैशल्य हे वाखण्याजाेगे अाहे. युराेपियन खेळाडूंसारखे स्किल त्याने प्रचंड मेहनतीतून विकसित केले. 
- जयदीप अंगीरवाल, फुटबॉल प्रशिक्षक

युरोप दौऱ्यात डेन्मार्क क्लबची अाॅफर   
वर्ल्डकपच्या तयारीसाठी भारतीय संघाने युराेपचा दाैरा केला. यादरम्यान अनिकेतने येथील मैदानावर दाखवलेली क्षमता आणि कौशल्याने डेन्मार्क क्लबच्या खेळाडूंनाही वेड लावले. त्यामुळे त्याला याच ठिकाणी या क्लबने अापल्यासाेबत करारबद्ध हाेण्याची अाॅफरही दिली. यासाठी मागेल ती रक्कम देण्याची या क्लबने तयारी दर्शवली.  
 
पुढील स्लाइडवर,  फुटबाॅलपटू अनिकेत जाधवचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...