आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला विषयातील सवलत गुणांसाठी 27 मे पर्यंत प्रस्ताव सादर करा; शाळा, महाविद्यालयांना सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुणांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी २७ मे पर्यंत आपले प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळास सादर करावेत. २७ में ही प्रस्ताव देण्याची अंतिम तारीख आहे. तशा सूचना बोर्डाने दिल्या आहेत.
 
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात. नुकताच राज्य शासनाने २०१६-१७ पासून कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्च २०१७ पासून होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांची सवलत देण्यात येणार आहे. या संदर्भात यापूर्वीच शाळांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या वाढीव गुणांच्या सवलतीसाठी प्रस्ताव सादर करण्याकरिता २८ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ३० एप्रिल पर्यंत ही मुदत वाढिवण्यात आली होती. तसेच काही कारणास्तव विद्यार्थ्यांनी उशीरा प्रमाणपत्र सादर केल्यास शाळांनी फक्त यावर्षीपूर्तेच प्रस्ताव स्विकारुन मंडळास सादर करावेत असेही सांगण्यात आले होते. जेणे करुन कोणताही विद्यार्थी सदर गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही.सध्या दहावीच्या निकालाचे काम बोर्डात सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुदत वाढ देत शाळांमार्फत २७ मे पर्यंतच हे प्रस्ताव स्विकारले जाणार आहे. त्यानंतर येणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाही असेही राज्य मंडळाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...