आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्यांत जर्मनीचे डॉक्टर जालन्यात, 6 कोटी रुपयांच्या शस्त्रक्रिया मोफत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीचे डॉक्टर्स, पद्मभूषण डॉ.ब्रदीनारायण बारवाले. - Divya Marathi
जर्मनीचे डॉक्टर्स, पद्मभूषण डॉ.ब्रदीनारायण बारवाले.
जालना - सुट्यांच्या काळात कुटुंबीयांसोबत कुठेतरी प्रेक्षणीय ठिकाणी किंवा मौजमजा करण्यासाठी जाणे ही प्रत्येकाच्या सवयीची गोष्ट. मात्र जर्मनीतील डॉक्टरांनी सुट्यांचा उपयोग विधायक कामासाठी खर्च करण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार ते दरवर्षी भारतात येऊन येथील रुग्णांची सेवा करतात. सलग १३ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून आतापर्यंत त्यांनी हजार ७०० रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी केली आहे. यावर्षी त्यांच्या उपक्रमाचे हे १४ वे वर्ष असून यात ते १२० रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी करणार आहेत. शनिवारपासून त्यांचा हा मानवतेचा अनोखा महायज्ञ सुरू झाला आहे. 
 
रोटरी क्लब ऑफ जालना यांच्या माध्यमातून जर्मनीतील ही डॉक्टर मंडळी जालन्यातील गरजू रुग्णांवर उपचार करीत आहेत. जिथे प्लास्टिक सर्जरीच्या या शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च होऊ शकतात असे ऑपरेशन अगदी मोफत केले जाते. यात दरवर्षी १० पेक्षा जास्त डॉक्टर या उपक्रमात सहभागी होतात. यावर्षी डॉक्टर आणि नर्स अशी ११ लोकांची टीम जालन्यात दाखल झाली असून त्यांनी आपले काम सुरू केले आहे. या शिबिरात दुभंगलेले ओठ आणि टाळू जळाल्याने आलेले व्यंग, शरीरावर जन्मत: असलेले काळे डाग, चिकटलेली बोटे आदींवर यशस्वी शस्त्रक्रिया केली जाते. जर्मनीतील डॉक्टर्स केवळ शस्त्रक्रिया करण्याबरोबर काही अत्यावश्‍यक असणारी औषधीही उपलब्ध करून देतात. त्यांच्या माध्यमातून झालेल्या शस्त्रक्रिया तसेच रुग्णांची प्रकृती याचाही ते शिबिरानंतर पाठपुरावा करतात. आजपर्यंत हजार ७०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली अाहे. या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना कोटी रुपये खर्च करावे लागले असते, मात्र या शिबिरामुळे ते विनामूल्य झाले आहे. शनिवारी पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण बारवाले यांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी रोटरी क्लब मुंबईच्या सुचित्रा हेडगे, हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. अनिल तिबरेवाला, मिशन हॉस्पिटलचे डॉ. सी. डी. मोजेस यांच्यासह रोटरी क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती. या समूहाने जालन्यात येऊन गरीब, शेतकरी अशा गरजू रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी केली आहे. 

^भारतातून काहीवेळा जाण्याचा योग आला. या माध्यमातून भारतीयांबद्दल अापुलकी प्रेम निर्माण झाले. रोटरीच्या माध्यमातून भारतीयांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आमच्या हातून गरिबांची, मुलांची सेवा होत आहे. ही सेवा आमचे पथक कायम देणार अाहे.
-डॉ. गेरहार्ड के. स्लॉशर, जर्मन डॉक्टरांच्या पथकाचे प्रमुख 
 
गरजूंना सेवा देण्याचे समाधान 
मिशन हॉस्पिटलमध्ये हे शिबिर सुरू आहे. या डॉक्टरांच्या पथकात डॉ. जेरहार्ट स्लॉशर हे प्रमुख असून त्यांच्याबरेाबर डॉ. मार्को ब्लेसमन, डॉ. डेटलेफ क्रामर, डॉ. पेरिक्लेस कोलोकिथास, डॉ. ज्युलियन क्वास्ट, डॉ. अंजा गेरस्टनबर्ग, डॉ. डेनिस कोडर, डॉ. कॅट्रिन श्रुमन, इल्क फिशर, सिल्के रिचर्टर, जॉर्ज मृगल्ला आदींचा समावेश आहे. 

सौंदर्यासाठी सर्जरी नाही 
या शिबिरात अत्यंत गरीब आणि गरजू रुग्णांची निवड करण्यात येते. शिबिरापूर्वी त्यांची तपासणी करून नोंदणी करण्यात येते. टाळू चिकटलेली असल्याने बोलता येणे, अन्न गिळण्यास त्रास, बोटे चिकटलेली असणे अशाच रुग्णांची निवड होते. सौदर्य खुलविण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली जात नाही. त्यामुळे या उपक्रमाचा अनेक गरजूंना लाभ झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...