आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटाेदा: वाघिरा येथे डाेंगरास लागली अाग; अधिकारी अनभिज्ञ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटाेदा - तालुक्यातील मांजरसुंबा रोडवरील वाघिरा येथील नवरानवमीच्या डोंगरावरील झाडांना आग लागलेली दिसली. ही आग लावली का लागली हे कळण्यास मार्ग नाही. ही आग वनव्यासारखी भडकतच राहिली. इतकी भयानक होती की आजूबाजूच्या झाडांची पार राख झाली. 
 
या आगीचे लोळ अाकाशापर्यंत उठत होते. ही आग विझवण्याची तसदी कोणीही घेतली नाही. एवढी मोठी घटना घडली तरी याची वनविभाग, सामाजिक वनीकरण यांना साधी कल्पना नाही. हे आश्चर्य वनविभाग, सामाजिक वनीकरण, यांच्या कडे कोणतीच माहिती नाही. या प्रकरणी कसलीच तक्रार पाटोदा पोलिस ठाण्यात दोन्ही विभागाकडुन दाखल नाही. उलट दोन्ही विभाग प्रमुखाकडे माहिती विचारली असता हा भाग आमच्याकडे येत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. 
 
अधिकाऱ्यांकडून टाेलवा टाेलवी 
वनविभागाचे काकडे यांना आगीसंदर्भात विचार असता हा वाघीरा भाग आपल्या वनविभागाकडे येत नाही तो सामाजिक वनीकरण यांच्याकडे येतो. सामाजिक वनिकरण विभागाचे विभागप्रमुख न्यायाधीश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा वाघिरा भाग वनविभागाकडे येतो त्याचा आमचा संबंध नाही आमच्या कडे फक्त रोडच्या बाजुचेच झाडे असतात. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...