आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला एक लाखाचा गंडा, एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे बनावट ऑफर लेटर दिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विमानतळावरनोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणाला एकाने लाख हजार रुपयांना फसवले. याप्रकरणी मोहंमद नवाजुद्दीन मोहंमद नईमुद्दीन (२५, रा. मनपा परिसर) याच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात फेब्रुवारी रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
नोकरीच्या शोधात असताना नवाजुद्दीनने शाइन डॉट कॉम या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केले होते. त्यानुसार वेबसाइटतर्फे एका व्यक्तीने नवाजुद्दीनला इंडिगो एअरलाइन्समध्ये नोकरीची संधी असल्याचे सांगितले. १६ जानेवारी रोजी जॉब एक्स्प्रेसमधून त्याला फोन आला. अर्ज करून पुढील प्रक्रियेसाठी संबंधित आरोपीने १६५० रुपयांची मागणी केली. नवाजुद्दीनने पेटीएमद्वारे ९९७0५७१८२९ या मोबाइल क्रमांकावर पैसे पाठवले. त्यानंतर त्याची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. १७ जानेवारी रोजी आरोपीने कॉल करून पुन्हा हजार ७०० रुपयांची मागणी केली. त्यामुळे नवाजुद्दीनने पेटीएमने रक्कम दिली. कंपनीने त्याची फोनवर मुलाखत घेऊन निवड झाल्याचे सांगितले. त्यानंतर १८ जानेवारीपासून ७८ हजार २०० रुपये उकळले. आॅफर लेटरची मूळ प्रत पोस्टाने पाठवली असून २३ जानेवारीला चिकलठाणा विमानतळावर रुजू होण्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र, २३ जानेवारी रोजी आरोपींशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दिली. 

नोकरी लागल्यावर आम्ही घर देतो 
नाेकरीलागल्यावर आम्ही घरसुद्धा देतो. विमानतळापासून काही अंतरावरच चार रूमचा फ्लॅट असून त्यासाठी तुम्हाला आधी ४३ हजार रुपये भरावे लागतील, असे कंपनीने सांगितल्यावर नवाजुद्दीनने वेळ मागितला. हा प्रकार संशयित वाटत असल्याने त्याने मेलवर आलेले ऑफर लेटर पाहिले. तेव्हा लेटर बनावट असल्याचे लक्षात आले. 
बातम्या आणखी आहेत...