आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात सापडले सुकेशिनी, चालक राजू; स्वत:च्या मुलाएवढ्या तरुणीशी होती जवळीक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मावशीला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या सुकेशिनी येरमेवर (२२, रा. वनभूजवाडी, ता. पालम) आणि चालक राजू बाबूराव माटे (४५) याला मुकुंदवाडी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातून अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या दोघांनी कोल्हापुरात भाड्याने फ्लॅट घेतला होता. आमचे लग्न झाल्याचेही ते सांगत होते. 
 
या दोघांनी कार अन् घरातील सामान कोल्हापुरात नेले होते. तेथे ११ महिन्यांचा बाँड करत एक अालिशान टू बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला. काही दिवस त्यांनी खोटे नाव सांगत लॉजमध्ये आश्रय मिळवला होता. पोलिसांनी तपास केला असता ती प्रथम पुण्याला गेली. त्यानंतर कोल्हापूरला गेल्याचे कळाले. ही माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते, अवचर महिला पोलिस शिपाई नरवडे यांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले. तीन दिवसांच्या मुक्कामानंतर पोलिसांना दोघांचा सुगावा लागला त्यांना अटक करण्यात आली. 
 
स्वत:च्या मुलाएवढ्या तरुणीशी केली जवळीक : सुकेशनी २५ वर्षे, तर राजू ४५ वर्षांचा आहे तरीदेखील त्याने तिच्याशी जवळीक साधली. राजूला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे वय २५ वर्षे आहे. हे दोघे कोल्हापुरात राहत होते. मागील आठ दिवसांत ते तिरुपती, गोवा, पनवेल या ठिकाणी विमानाने जाऊन आले. राजू हा उधळपट्टी करणारा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले अाहे. त्याने शहरातील अनेक मोठ्या लोकांच्या गाड्यांवर चालक म्हणून काम केले आहे. 
 
काय आहे प्रकरण ? 
अमेरिकेत स्थायिक असलेले डॉ. शिवाजी गुणाले हे सुकेशिनीच्या मावशीचे पती आहेत. सुकेशिनीने शहरातील बंगला, सोने विकून त्यांची फसवणूक केल्याची तक्रार गुणाले यांच्या भाच्याने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या घरातील चालकाने तिला मदत केल्याचे समोर आले होते. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
बातम्या आणखी आहेत...