आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवावृत्ती: मोफत औषधोपचार करणारा अवलिया, अब्दीमंडी येथे 1985 पासून गोरगरीब रुग्णांना मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाॅ. वाय. सी. पठाण - Divya Marathi
डाॅ. वाय. सी. पठाण
औरंगाबाद - रंजल्या-गांजल्यांच्या दु:खावर मदतीच्या माध्यमातून मायेची फुंकर घालणारे अब्दीमंडी येथील डाॅ. वाय. सी. पठाण मागील १९८५ पासून अनेक रुग्णांना मोफत सेवा देत आहेत. रविवारीदेखील त्यांचा दवाखाना बंद नसतो. ते केवळ औषधोपचारच करत नाहीत तर गरजूंना गाडीभाडेदेखील देतात. त्यांच्या सेवेची ख्याती परिसरातील अनेक गावांत पसरली आहे.  
त्यांच्या दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाची अास्थेवाईकपणे विचारपूस केली जाते. त्यांची आर्थिक परिस्थितीही जाणून घेतात. उपचारासाठी पैसे नसतील तर घाबरू नका, मोफत इलाज केला जाईल, असे सांगून रुग्णांना दिलासा देतात. ही सेवा ते १९८५ पासून अविरतपणे करत आहेत. विशेष म्हणजे औषध खरेदी किंवा गाडीभाड्यासाठी पैसे नसणाऱ्या रुग्णांना ते स्वत:च्या खिशातून पैसे देतात. मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांना ते खासगी आणि महागड्या रुग्णालयांची वाट दाखवत नाहीत. ते सरळ सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देतात. किंबहुना सरकारी दवाखान्यातील आपल्या डाॅक्टर मित्रांना फोन करून आपल्याकडे पाठवत असलेल्या रुग्णाची काळजी घेण्याची विनंती करतात. मीदेखील एका गरीब कुटुंबातून आलो आहे. गरिबी आणि उपचारादरम्यान रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची होणारी हेळसांड  याची मला जाणीव आहे. त्यामुळे मनामध्ये मदतीची भावना आहे.
 
दररोज किमान पाच रुग्णांवर मोफत उपचार...  
दररोज पाच ते दहा रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. बऱ्याच  गरीब रुग्णांकडे औषधीसाठी पैसे नसतात. त्यांना मदत केली जाते. हे कार्य करत असताना त्यांना कधीही प्रसिद्धीचा मोह झाला नाही, हे येथे उल्लेखनीय.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...