आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका सिग्नलवर एक वाहन १५ सेकंद बंद केल्यास १० टक्के इंधनाची बचत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात २०० सिग्नल आहेत. ११ लाख ४४ हजार वाहने आहेत. दररोज बाहेरून येणाऱ्या हजारो वाहनांची त्यात भर पडते. एका सिग्नलवर किमान ते दीड मिनिट थांबावे लागते. अशा वेळी जळणारे डिझेल, पेट्रोलची हानी टाळण्यासाठी एका वाहनचालकाने एका सिग्नलवर १५ सेकंद वाहन बंद केल्यास १० टक्के इंधनाची बचत होईल. केंद्रीय रस्ते संशोधन संस्था पेट्रोलियम रिसर्च असोसिएशनने सर्वेक्षणाद्वारे टिपलेल्या वास्तवाचा आढावा ‘दिव्य मराठी’ने घेतला आहे.
शहरात ट्रॅफिक इंटरसेक्शन मोठ्या प्रमाणावर आहे. जेवढे जास्त सिग्नल तेवढी वाहने थांबून इंधनाची हानी होते. ही हानी मोजण्यासाठी इंधन बचत व्हावी, आर्थिक, पर्यावरणाची हानी टळावी, वाहनसेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. त्यानुसार दिल्लीत इंधनाचे वार्षिक नुकसान ९९४ कोटी रुपये आहे. यामध्ये बदल करण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाने १५ सेकंद सिग्नलवर वाहन बंद केल्यास किमान १० टक्के एका वाहनातील इंधन वाचवण्यात अापण यशस्वी होऊ शकतो, असा दावा प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके एचपीसीएलचे एरिया मॅनेजर प्रेमसिंग यांनी केला.

संशोधनाचे निष्कर्ष : कारपूलच्यावापराने ५० टक्के खर्च बचत शक्य एकाच कंपनीतील दोन अधिकाऱ्यांनी खर्च वाटून एका वाहनात दररोज प्रवास केल्यास महिन्याच्या इंधन खर्चात ५० टक्के बचत होऊ शकते. यासाठी समन्वयातून प्रयत्न झाले तरी मोठ्या प्रमाणावर इंधन त्यावर होणाऱ्या खर्चाला आळा बसू शकेल.

अनावश्यक गिअर बदलल्यास २० टक्के इंधन हानी... : गाडीनेहमी पहिल्या गिअरमध्येच सुरू करावी. मात्र, अनावश्यक ठिकाणी अनावश्यक गिअर बदलल्यास २० टक्के इंधनाची हानी होते.
एसीचावापर महागडा : एअरकंडिशनर यंत्राचा योग्य वापर २० टक्के इंधनाची बचत करू शकतो. जास्त वापर केल्यास इंधन जास्त जळेल.

हा बदल हवा...
^शहराची वाहनसंख्या ११ लाखांवर आहे. १५ ते २० सेकंदांचेही सिग्नल आहेत. त्याऐवजी ३० सेकंद ते मिनिटे असा वेळ निश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे पूर्ण राउंड येण्यासाठी ते मिनिटांचा वेळ लागेल. सर्व वाहनचालक सिग्नलवर वाहने थांबवतील. यातून इंधन बचत होऊ शकते. सर्जेरावशेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी

दरवर्षी २२ टक्क्यांनी वाढतोय इंधनाचा वापर
^३ लाख लिटर पेट्रोल, प्रतिलिटर ७१.७५ पैसे, १.५ लाख लिटर डिझेल, प्रतिलिटर ६०.९४ दराने विक्री होते. दरवर्षी २२ टक्क्यांनी इंधनाचा वापर वाढतो आहे. अखिलअब्बास, अध्यक्ष, पेट्रोल-डिझेल असोसिएशन.
असे होतील फायदे
- १५ सेकंद सिग्नलवर वाहन बंद केल्यास किमान १०% एका वाहनातील इंधन वाचवणे शक्य
ऊर्जा सुरक्षिततेत वाढ, इंधनातही होईल बचत

- ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर सोडण्याच्या प्रमाणात घट नक्की घट होईल
- क्रूड तेलाच्या आयात खर्चात राष्ट्राची बचत
- वैयक्तिक पैशाची बचत

१५ ते २० सेकंदांचेही सिग्नल आहेत
वेग जास्त इंधन जास्त
वाहन चाचण्यांतून असे सिद्ध झाले आहे की, ताशी ४५ किलोमीटर वेगाला उत्तम मायलेज मिळते. वाहन हळू आणि सातत्याने चालवा. जितके जलद तुम्ही जाल, तितका तुमच्या वाहनाला वाऱ्याच्या प्रतिकाराचा जास्त सामना करावा लागेल. ६५ किमी वेगाने चालवाल तर १५ टक्के ८५ किमी वेगाने चालवल्यास ३० टक्के जास्त इंधन वाया घालवाल.

जास्त वजन टाळा
शहरात वाहन चालवताना वजनात ५० किलोग्रॅमची घट टक्के इंधनची बचत करते. जास्त वजनामुळे वाऱ्याचा प्रतिबंध वाढताे. त्यामुळे इंधनाचा वापर वाढतो.
टायर प्रेशर
टायर प्रेशर २५ टक्के कमी असल्यास टायरचा फुगवटा कमी होतो. त्यांच्या फिरण्याला प्रतिबंध निर्माण झाल्याने इंधन वापरात ते १० टक्के वाढ होते. याचा सर्वांनी विचार करून गाडीच्या टायरमध्ये योग्य प्रेशर ठेवणे गरजेचे आहे.

योजना आखा
गर्दीचा मार्ग निवडला तर इंधन जास्त लागेल. त्याऐवजी कमी गर्दीचा, लांब पल्ल्याचा मार्ग निवडला तरी मायलेज जास्त मिळेल. पण अरुंद रस्ते, वाहतुकीच्या कोंडीमुळे इंधन जास्त जळते.

इंजिन ट्यून करा
गाडी नेहमी ट्यून केल्याने एखादी व्यक्ती टक्के इंधनाची बचत करू शकते. हजार किमी चालवल्यानंतर किंवा उत्पादकाने सांगितल्याप्रमाणे वाहनाची तपासणी करावी.
अमरप्रीत चौकात टायमर नसल्यामुळे सिग्नलवर वेळ लागतो.
बातम्या आणखी आहेत...