आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर पोलिस - ‘दिव्य मराठी’ तर्फे गणेशोत्सव देखावे, मिरवणूक स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - गंगापूर पोलिस ठाणे व ‘दैनिक ‘दिव्य मराठी’च्या संयुक्त विद्यमाने उत्सव काळात विधायक कामांसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शहरातील गणेश मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये गणेशोत्सव कालावधीत उत्कृष्ट देखावे व मिरवणुकीसाठी मंडळांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांनी गणेशाची स्थापन केलेली मूर्ती इको-फ्रेंडली आहे का, मूर्तीचा आकार, उत्सव काळात मंडळाने भाविकांच्या सुरक्षिततेबाबत घेतलेली दक्षता, मंडळांनी केलेली सजावट, परिसरात ठेवलेली स्वच्छता, लोकमान्य महोत्सवानिमित्त देखावे व समाज प्रबोधनाचे उपक्रम या बाबींचा विचार यासाठी करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणूक काळातील ध्वनिक्षेपण व्यवस्था, फुलांचा वापर करून गुलालविरहीत मिरवणूक, मिरवणुकीतील सदस्यांचे वर्तन या बाबी लक्षात घेऊन बक्षिसासाठी मंडळांची निवड करण्यात येणार आहे.

या बाबींची पूर्तता करणाऱ्या गंगापुरातील तीन मंडळांना प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार प्रदान येणार असून स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. तरी या स्पर्धेत गणेश मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव, समितीचे अध्यक्ष राजेंद्र सरोवर, सदस्य प्रवीण पारख, मनीष वर्मा, विशाल गायकवाड, अतुल कुलकर्णी आदींनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...